पिकांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवावा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

 
omarje

  वाशी  -    जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामाच्या सर्व पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गीक आपत्तीने हिसकावला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पीकांचे ‘सततचा पाउस हा निकष ग्राह्य धरून केंद्र सरकारच्या NDRF आणि राज्य शासनाच्या SDRF निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणेकरीता तात्काळ पंचनामे करावे आणि एकाही शेतकऱ्याची शेतजमीन पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही ही दक्षता घ्यावी, अशा सुचना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर दिल्या . 


 वाशी तालूक्यातील सरमकुंडी, तांदळवाडी, जवळका, शेंडी, पिंपळगाव (क), हातोला, पारगाव यांसह तालूक्यातील सततच्या पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झालेल्या गावांतील पाहणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली. या दौऱ्यावेळी त्यांनी  प्रशासनाला सूचना दिल्या व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी APP वर GPS फोटो व सातबारा अपलोड करावे व सतत च्या पावसाने नुकसान झाले असल्याचा तक्रारी अर्ज तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार कार्यालयात द्यावा व पोहच घ्यावी, असे आवाहन केले . 

जुलै -  ऑगस्ट मध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे खरीप हंगाम २०२२ मधील मुख्य पीक असलेल्या सोयाबीन, उडीद, मुग, तुर पीकांवर विविध कीडींचा प्रादुर्भाव झाला आहे. शंखी गोगलगाय व इतर कृमीजन्य कीडींद्वारा मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. वाशी तालूक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली खरीप हंगामातील सर्व पीके बाधीत झालेली आहेत. केंद्र शासनाच्या NDRF आणि राज्य शासनाच्या SDRF निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणेकरीता सदर पंचनामे तात्काळ पुर्ण करून पंचनाम्याचा अहवाल शासनास लवकरात लवकर सादर करण्याबाबतच्या ही सुचना यावेळी खा.  ओमप्रकाश राजेनिंबाळकरयानी संबंधीतास दिल्या.

             याप्रसंगी जिल्हा प्रमुख गौतम लटके  विधानसभा समन्वयक दिलीप शाळू महाराज, तालूका प्रमुख विकास मोळवणे, युवा शहर प्रमुख, वाशी, लायक भाई तांबोळी, शहर प्रमुख अनिल गवारे, वाशी बाळासाहेब उंदरे, तात्या गायकवाड गट प्रमुख, तहसीलदार नरसिंग जाधव, तालुका कृषी अधिकारी, संतोष कोयले, गट विकास अधिकारी राजगुरू व शेंदरे उप अभियंता यांच्यासह शेतकरी, नागरिक आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.    

From around the web