१० जानेवारी पर्यंत पंचनामे उपलब्ध होणार - आ. राणाजगजितसिंह पाटील​​​​​​​​​​​​​​

 
rana

उस्मानाबाद - खरीप २०२२ मधील पंचनाम्याच्या प्रती १० जानेवारी २०२३ पर्यंत उपलब्ध करून देण्यासह तुळजापूर, लोहारा व उमरगा तालुक्यातील उर्वरित अनुज्ञेय अग्रीम नुकसान भरपाईची रक्कम रुपये ३५ कोटी पुढील आठवड्यात वितरित करण्याचे भारतीय कृषी विमा कंपनीचे मुख्य सांख्यिकी अधिकारी सिद्धेश रामसुब्रमण्यम यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील  यांना आश्वासित केले आहे.

अतिवृष्टी, सततचा पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पूर्वसूचना देऊन देखील जिल्ह्यातील जवळपास १.५ लाख शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. अनेकांना अत्यल्प नुकसान भरपाई देण्यात आली आहे, तर भरपाई दिलेल्या सर्वांनाच नियमबाह्य पद्धतीने ५० टक्के भारांकण लावून निम्मीच नुकसान भरपाई वितरित केली आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे उपलब्ध करून देण्याची मागणी विमा कंपनी कडे करण्यात आली होती. जिल्हाधिकारी धाराशिव (उस्मानाबाद) यांच्या आदेशानंतरही विमा कंपनीकडून पंचनामे उपलब्ध करून देण्यात येत नव्हते. विभागीय विभागीय आयुक्तांना याबाबत अवगत करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील सूचित केले होते.

नुकसान भरपाई रकमेतील तफावत दूर करणे व वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध होणे आवश्यक आहे व याबाबत आ. राणाजगजितसिंह पाटील अतिशय आग्रही असून विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला यश आले असून भारतीय कृषी विमा कंपनीचे दिल्ली येथील मुख्य सांख्यिकी अधिकारी  सिद्धेश रामसुब्रमण्यम यांच्याशी काळ दि. ३०/१२/२०२२ रोजी झालेल्या चर्चे दरम्यान १० जानेवारीपर्यंत पूर्वसूचना प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासित केले आहे. पंचनामे उपलब्ध झाल्यानंतर पुढील योग्य ती कार्यवाही अनुसरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तुळजापूर, उमरगा व लोहारा तालुक्यात हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत मुळे झालेल्या नुकसानीपोटी शिल्लक अग्रीम रक्कम रुपये ३५ कोटी देखील पुढील आठवड्यात वितरित करण्याचे त्यांनी मान्य केले आहे. अग्रीम नुकसान भरपाई साठी पात्र काही शेतकऱ्यांना यापूर्वीच विमा मिळालेला आहे. ज्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही, अशा उर्वरित पत्र शेतकऱ्यांना हि रक्कम दिली जाणार आहे.

हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी रु. ३६०० कोटींची तरतूद करण्यात आलेली असून यातून सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यामधील सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाकडून केलेली रु. २२० कोटींची मागणी १५ जानेवारी पर्यंत प्राप्त होणे अपेक्षित आहे. त्यामुळे नव वर्षाच्या सुरुवातीलाच सततच्या पावसाचे रु. २२० कोटी व अग्रिम नुकसान भरपाईची रक्कम रु. ३५ कोटी जिल्हावासीयांना प्राप्त होणार असून खरीप २०२० मधील रु. ३३० कोटी व खरीप २०२१ मधील रु ३८९ कोटी शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील प्रयत्नशील आहेत. 

From around the web