पीकविमा खरीप हंगाम 2020 पात्र लाभार्थ्यांच्या सुधारित याद्या ग्रामपंचायतींना लावण्याचे आदेश 

 
f

उस्मानाबाद -  सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी सण साजरा करता आला नाही. तरीही शेतकरी अजून संयम बाळगून आहेत. पीकविमा खरीप हंगाम 2020 हा शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा असून तो मिळण्यासाठी मागील 5 दिवसांपासून आमदार कैलास पाटील यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु असून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत आहेत. याचा निर्ढावलेल्या प्रशासनावर परिणाम होवून पीकविमा खरीप हंगाम 2020 च्या पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रशासनाने तयार केल्या आहेत. 

धाराशिव तालुक्यातील 75 हजार 28 शेतकऱ्यांना 73 हजार 800 हेक्टर क्षेत्रासाठी 133 कोटी, तुळजापूर तालुक्यातील 65 हजार 92 शेतकऱ्यांना 70 हजार 335 हेक्टर क्षेत्रासाठी 126.60 कोटी, उमरगा तालुक्यातील 36 हजार 132 शेतकऱ्यांना 32 हजार 372.77 हेक्टर क्षेत्रासाठी 58.27 कोटी, लोहारा तालुक्यातील 24 हजार 949 शेतकऱ्यांना 23 हजार 862.24 हेक्टर क्षेत्रासाठी 42.95 कोटी, भूम तालुक्यातील 37 हजार 85 शेतकऱ्यांना 29 हजार 276.65 हेक्टर क्षेत्रासाठी 34.70 कोटी, परांडा तालुक्यातील 3 हजार 163 शेतकऱ्यांसाठी 2 हजार 12.17 हेक्टर क्षेत्रासाठी 3.62 कोटी, कळंब तालुक्यातील 89 हजार 994 शेतकऱ्यांना 63 हजार 131.57 हेक्टर क्षेत्रासाठी 113.64 कोटी तसेच वाशी तालुक्यातील 32 हजार 66 शेतकऱ्यांना 19 हजार 871.75 हेक्टर क्षेत्रासाठी 35.77 कोटी अशा एकुण 3 लाख 53 हजार 499 शेतकऱ्यांना 3 लाख 04 हजार 751.38 हेक्टर क्षेत्रासाठी 548.55 कोटी रुपये निधीच्या सुधारित याद्या प्रशासनाने तयार केल्या असून ग्रामपंचायतींना या याद्या लावण्याच्या संदर्भात आदेशित केले आहे.

f

झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला व विमा कंपनीला जाग कधी येणार ? – खा. ओमराजे निंबाळकर

           2020 खरीप हंगामाचे उर्वरित 330 कोटी, 2021 चे उर्वरित 50 टक्के 388 कोटी विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे नुकसानभरपाई अनुदान 248 कोटी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आमदार कैलास पाटील यांचे 5 दिवसापासून उपोषण चालू असून अद्याप झापेचे सोंग घेतलेल्या प्रशासनास जाग आलेली नाही. मागण्या पुर्ण करण्यासाठी तसेच मा. आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी गोगाव पाटी करजखेडा येथे तुळजापूर औसा या महामार्गावर परिसरातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांसह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सदर महामार्गावर वाहतुक कोंडी होवून महामार्गावरचे दळणवळणे ठप्प झाले होते.

            पीकविमा खरीप हंगाम 2020 चे 330 कोटी 2021 चे उर्वरित 388 कोटी, नुकसान भरपाईचे अनुदान 248 कोटी रुपये तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याकरीता शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा तसेच पीकविमा वाटप गांभार्याने घ्यावे न घेतल्यास गांधीगिरी न करता यापुढे शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा सजड इशारा रास्ता रोको आंदोलनासमयी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला. तसेच शिवसैनिकांनी शिवसेना स्टाईलने जिल्हाभरात वरील मागण्या पुर्ण होईपर्यंत आंदोलन करावे यासंबंधी सुचना दिल्या.

            याप्रसंगी संतोष सोमवंशी, संजय देसाई, सतिषकुमार सोमाणी, मोईन खान, आकाश पाटील, संजय खडके, सुभाष कळसुले, मुकेश पाटील, अमोल मुळे, दिनेश हेड्डा, राजाभाऊ नळेगावकर, नाना डोले, ऋषिकेश पाटील, अरुण निलंगे, मंगेश सोनवणे, नेताजी गायकवाड, अनिल अरनडर, काकासाहेब पिंपरे, सुरज इंगळे, विकास इंगळे, शंकर पाटील, दादा कोळपे, सौदागर जगताप, आबा सारडे, आदीसंह हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

From around the web