संपूर्ण ऊस गाळप होईपर्यत कारखाने चालू ठेवण्याचे आदेश द्या

दुधगावकर यांची खा.शरद पवार यांच्याकडे मागणी
 
UDHGAVKR

उस्मानाबाद : जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊसकाळ झाला आहे. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे संपूर्ण ऊस गाळप होईपर्यत कारखाने चालू ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी खा. शरद पवार यांच्याकडे रविवारी (दि.6) केली आहे.


निवेदनात दुधगावकर यांनी जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 52 हजार हेक्टर ऊस लागवडीची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. आजपर्यंत (3 मार्च 2022) 47 लाख मेट्रीक टन गाळप खाजगी व सहकारी साखर कारखान्यामध्ये झालेले आहे. अजूनही जवळपास 18 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाअभावी  शेतकर्‍यांच्या शेतात उभा आहे. 

हा सर्व ऊस गाळप होण्यासाठी 40 दिवस साखर कारखाने चालू राहणे अपेक्षीत आहे. त्यासाठी 10 मे 2022 पर्यंत जिल्ह्यातील सर्व कारखाने चालू राहणे अपेक्षीत आहे. अन्यथा उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील 2 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाअभावी शेतकर्‍यांच्या शेतात उभा राहणार आहे. त्यासाठी आपण सर्व कारखान्यांना 10 मे 2022 पर्यंत कारखाने चालू ठेवण्यासाठी सुचित करावे व शेतकर्‍यांचे होणारे मोठे नुकसान टाळावे, अशी विनंती निवेदनात दुधगावकर यांनी केली आहे.

From around the web