हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनेत शेतक-यांनी सहभागी व्हावे - महेश तीर्थकर

 
fal

उस्मानाबाद - हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2022-23 अंतर्गत उस्मानाबाद जिल्हयासाठी  मृग बहारात मोसंबी, चिकू, डाळींब, पेरु, सिताफळ व लिंबू या फळपिकांचा समावेश आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असुन कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकांकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी पर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करणे बाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे.

 जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणेबाबत घोषणापत्र  देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल. या योजने अंतर्गत कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त तापमान, सापेक्ष आर्द्रता, या हवामान धोक्यापासून संरक्षण मिळणार असुन योजनेत सहभाग घेणेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असुन बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्जसोबत आधार कार्ड, 7/12 उतारा, फळबागेचा अक्षांश व रेखांश सह फोटो व बँक पासबुकची प्रत इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. खालीलप्रमाणे विमा हप्ता रक्कम भरुन पिक संरक्षित करणे आवश्यक आहे.

फळपिकाचे नाव

विमा संरक्षित रक्कम रू. प्रति हेक्टरी

विमा हप्ता रक्कम रु. प्रति हेक्टरी (शेतकरी हिस्सा)

विमा हप्ता भरण्याचा अंतिम दिनांक

मोसंबी

80000

8400

30 जून 2022

चिकू

60000

4200

30 जून 2022

डाळींब

130000

6500

14 जुलै 2022

लिंबू

70000

10500

14 जून 2022

पेरु

60000

3300

14 जून 2022

सिताफळ

55000

2750

31 जुलै 2022

हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना मृग बहारासाठी फळपिकनिहाय अधिसुचित महसूल मंडळे.

फळपिकाचे नाव

अधिसुचित तालुके

अधिसुचित महसूल मंडळे

मोसंबी

उस्मानाबाद

उस्मानाबाद ग्रा., पाडोळी, तेर, ढोकी, जागजी

कळंब

शिराढोण

चिकू

परंडा

परंडा, आसु, जवळा नि., आनाळा, सोनारी

भूम

माणकेश्वर

 डाळींब व सिताफळ

जिल्हयातील सर्व तालुके

उस्मानाबाद जिल्हयातील सर्व महसूल मंडळे.

लिंबू

तुळजापूर

सावरगाव

परंडा

परंडा, आसु, आनाळा, सोनारी

पेरु

उस्मानाबाद

उस्मानाबाद ग्रा., बेंबळी, केशेगाव, पाडोळी, तेर, ढोकी, जागजी

तुळजापूर

तुळजापूर तालुक्यातील सर्व महसुल मंडळे

कळंब

कळंब तालुक्यातील सर्व महसुल मंडळे

उमरगा

उमरगा तालुक्यातील सर्व महसुल मंडळे

परंडा

परंडा तालुक्यातील सर्व महसुल मंडळे

भूम

माणकेश्वर, भूम, वालवड, ईट

लोहारा

लोहारा तालुक्यातील सर्व महसुल मंडळे

वाशी

वाशी तालुक्यातील सर्व महसुल मंडळे

उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेता येईल. तरी वरील मंडळातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहीतीसाठी PMFBY.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा नजिकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा. 

From around the web