विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी भरसभेत सुरेश पाटील यांना झापले... 

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संपली -  सुरेश पाटील यांची मुक्ताफळे
 
as

उस्मानाबाद - कसबे तडवळे येथील एस. पी शुगरच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता , या प्रसंगी बोलतांना  उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संपली असल्याची मुक्ताफळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस तथा एस.पी.शुगरचे सुरेश पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे समोर उधळले तसेच राज्याचे आरोग्य मंञी तथा उस्मानाबाद जिल्हाचे पालकमंञी डाॕ.तानाजी सावंत यांना भर चौकात मारण्याची धमकी दिली व जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त मीच एकमेव एकनिष्ठ असल्याचा आव दाखवला . सुरेश पाटील यांच्या  वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात जमलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह देखील प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती.  

 यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष कधीच संपत नसतो. भाजपने दोन जागांच्या बळावर सुरुवात करून सत्ता मिळवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी संपली अशा पोकळ गप्पा मारू नये असे खडसावत सुरेश पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस संपणार नाही असे सुनावत आयोजित मेळाव्यात झापले त्यामुळे उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या तसेच पक्षाचे काम होत नसेल तर  व्यासपीठावरील कांहीना पक्षा बाहेर काढावे लागेल असेही अजित पवार म्हणाले  सुरेश पाटील यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त मीच एकमेव एकनिष्ठ पदाधिकारी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला माञ पवार यांचेकडे तक्रारीच्या चिट्या  अनेक आल्याने पाटलांचे सर्वासमोर पितळ उघडे पडले.  त्यामुळे अजीत पवार यांचे समोर पाटलांना वारंवार घाम पुसावा लागला .

शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे यासाठी स्पर्धा लावा . आमच्या आयान शुगरने  2500/- रु भाव दिला शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत सुरेश पाटील तुम्ही ऊसाचा गुळ करा नाही तर रस  करा परंतु शेतकऱ्यांना भाव चांगला द्या असे सुनावले या प्रसंगी पाटलांच्या व्यासपीठावर बीडचे बजरंग सोनवने यांचे पवार यांनी कौतुक केले व आ. विक्रम काळे यांनी पुञ समीर पाटलांना बापाचे सगळंच ऐकू नका असा सल्ला दिल्याने कारखान्याच्या सभासदांमध्ये तडवळा पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे,  

 या प्रसंगी प्रिंट मिडीया व ई- मिडीयांचे प्रतिनिधीनी मेळाव्याला आलेल्या अनेक सभासदांच्या प्रतिक्रिया जानून घेतल्या असता सुरेश पाटील यांच्याविषयी प्रचंड नाराजी व्यक्त करुन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे कडे ऊसाला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

From around the web