अनुदानातून धाराशिव वगळले हे असत्य -  आ. राणाजगजितसिंह पाटील

मंत्रिमंडळ उपसमितीच्या मान्यते नंतर मिळणार सततच्या पावसाचे रु २२० कोटी अनुदान 
 
rana

धाराशिव - उस्मानाबाद  :    खरीप २०२२ मध्ये सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानी पोटी अधिकचे रू.२२० कोटी पुढील आठवड्यात असलेल्या मंत्रीमंडळ उप-समितीच्या बैठकीत मंजुर होणे अपेक्षित आहे. धाराशिवला अनुदानातून वगळले हे पुर्णतः असत्य व खोडसाळपणाचे आहे, असे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. 

धाराशिव जिल्ह्याला यापूर्वी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी पोटी रू.९० कोटी तर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानी पोटी रू.१५४ कोटी अनुदान प्राप्त व वितरीत झाले आहे. तसेच अतिवृष्टीच्या नुकसानी पोटी अधिकचे रू.५९ कोटी अनुदान देखील मंजुर असून ते देखील लवकरच वितरीत होणार आहे.

सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानी पोटी अधिकच्या रू.२२० कोटी अनुदानाची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. संपूर्ण राज्याची या करिता रु. १८०० कोटींची मागणी आहे. शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना एनडीआरएफ /  एसडीआरएफ निकषांच्या पुढे जाऊन तीन हेक्टर पर्यंत प्रती हेक्टरी रु. १३६०० प्रमाणे अनुदान दिले आहे.  सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानी पोटी तर पहिल्यांदाच शेतकऱ्यांना या प्रकारे भरीव मदत दिले जात आहे. यापूर्वी कोणत्याही सरकारने अशी मदत केली नव्हती.  

सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानी पोटी अनुदान देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली असून पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ उप-समितीच्या बैठकीत यास मान्यता मिळणे अपेक्षित आहे, असे आ. राणाजगजितसिंह पाटील म्हणाले. 

From around the web