नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता शेतकऱ्यांनी वेळेत पिक विमा हप्ता भरावा …

- आ. राणाजगजितसिंह पाटील
 
rana

धाराशिव ( उस्मानाबाद )  - निसर्गाच्या अवकृपेमुळे या वर्षी देखील संभाव्य नुकसान लक्षात घेता प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२२-२३ अंतर्गत शेतकऱ्यांनी दि.३१.०७.२०२२ पर्यंत विमा हप्ता भरावा असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. तसेच सन २०२० व २०२१ च्या प्रलंबित विम्याबाबत पाठपुरावा चालू असून येणाऱ्या १५ दिवसात याबाबतीत सकारात्मक कृती बघायला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२२-२३ अंतर्गत जिल्ह्यातील आतापर्यंत भरण्यात आलेल्या पिक विम्याचा तपशील पाहता सन २०२१-२२ च्या तुलनेत २५ % तर सन २०२०-२१ च्या तुलनेत केवळ १८% च शेतकऱ्यांनी विमा भरल्याचे निदर्शनास आले आहे. सध्यस्थितीत फक्त १६७३१७ अर्जदारांनी १३१४३० हे. क्षेत्रासाठी विमा संरक्षित केला असून दि. ३१.०७.२०२२ हि विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख आहे. अतिवृष्टी, गोगलगायीचा प्रादुर्भाव अस्या निसर्गाच्या अवकृपेमुळे या वर्षी देखील संभाव्य नुकसान लक्षात घेता बळीराज्याला पिक विमा संरक्षणाची नितांत गरज आहे.

सन २०२० व २०२१ च्या अनुभवावरून पिक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असले तरी आता विमा कंपनी बदलली आहे. एग्रिकल्चर इंश्योरंस कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड (एआइसी) ही केंद्र सरकारची आपली हक्काची कंपनी आहे, त्यांचा उस्मानाबाद जिल्ह्यातील आधीचा अनुभव देखील चांगला आहे. त्यामुळे आपल्याला इथे निश्चितपणे वेळेत न्याय मिळेल याची खबरदारी घेऊ असे आ. पाटील यांनी सांगितले.

 सन २०२० च्या पिक विम्याबाबतचा विषय  सर्वोच्च न्यायालयात आहे, न्यायालया बाहेर याबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत जेणेकरून दिरंगाई विना शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळतील. केंद्र व राज्य सरकारने विमा कंपनीला हप्त्यापोटी रु. २३२ कोटी देणे बाकी असल्याने ही रक्कम थेट शेतकऱ्यांना देण्याबाबत देखील प्रयास चालू आहे. तसेच  सन २०२१ च्या विम्याबाबत मंत्रिमंडळ गठीत होऊन खाते वाटप झाले कि तातडीने बैठक घेण्याबाबतची प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात या दोन्ही विषयाबाबत सकारात्मक कृती बघायला मिळेल असा विश्वास व्यक्त करत शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पैसे जमा व्हावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

From around the web