स्नेलकीलच्या वापरामुळे पक्षांना हानी , शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन 

 
sheti

उस्मानाबाद- जुनच्या मध्यंतरी थोडाफार पाउुस झाल्यामुळे जिल्हयातील ब-याच शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या उरकल्या जेमतेम पाऊस पडल्यामुळे सोयाबिनची उगवण ही ब-या प्रमाणात झाली. मात्र आता सोयाबिन पिकावर गोगलगाय चा उपद्रव होत आहे. गोगलगायी उगवलेल्या कोवळया पिकांवर हल्ला करुन ते कुरतडून खात आहेत. बरेच शेतकरी गोगलगायी मारण्यासाठी स्नेलकील या औषधाचा वापर करीत आहेत. तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की, गोगलगायी  मारण्यासाठी स्नेलकील वापरताना त्याची पावडर किंवा पेस्ट बनवुन चुरमुरेला लावून वापरु नका. कारण ते चुरमुरे खाऊन पक्षी मरत आहेत. स्नेलकीलच्या चुकीच्या वापर पध्दतीने पक्षी संपुन जातील. तरी स्नेलकील त्याच्या मुळ स्वरुपातच वापरा पक्षी वाचवा तसेच निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करा असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले आहे.

या अधिच गेल्या खरीपातील अतिवृष्टीच्या तडाख्याने प्रचंड नुकसान होऊन हातातोंडाशी आलेली पिके हिरावली गेली आहेत. बोगस बियाणे, दुबार-तिबार पेरणी,  त्यात खरीपातील पिक विमा पण न मिळाल्यामुळे आर्थिक चिंता अशा एक ना अनेक परिस्थितीत आपण आतापर्यंत धीराने तोंड दिले आहे, पण शेवटी आताच्या परिस्थितीत त्यातून आलेली हतबलता यामुळे बेचैन होणे साहजिकच आहे, पण तरीही कृपया मायबापानो कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका किंवा विचार करू नका, हीसुद्धा वेळ निघून जाईल, आम्ही तुमच्या सोबत आहोत.कोणतीही अडचण असो, आपण त्यातून नक्की मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, पण हार मानू नका. फोन आल्यानंतर योग्य यंत्रणेशी जोडून देऊन मार्गदर्शन करून सल्ला, मार्गदर्शन देऊन, त्रस्त शेतकरयांना समुपदेशन करून मानसिक आधार देण्यात येईल त्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत झालेली आहे.फक्त शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ एक फोन करा, असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले आहे.

यासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय, गडपाटी, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.

From around the web