गुड न्यूज : खरीप २०२२ पीक विम्याचे  २०० कोटी लवकरच जमा होणार

 
pikvima

उस्मानाबाद  :  शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून जलद गतीने निर्णय होत असून धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप २०२२ मधील नुकसानीपोटी लवकरच पुढील टप्प्यातील जवळपास रु. २०० कोटी जमा होणार आहेत. 

खरीप हंगाम संपताच विक्रमी वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यावर दिनांक ३० नोव्हेंबर पासूनच विमा जमा होण्यास सुरुवात झाली असून आजवर  २९३४१४ शेतकऱ्यांना रु. २५८ कोटी वितरित करण्यात आले आहेत. राज्य सरकारने उर्वरित हप्त्याची रक्कम रुपये ७२४ कोटी सर्व विमा कंपन्यांना वर्ग करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला असून भारतीय कृषी विमा कंपनी ला प्राप्त झालेल्या विमा हप्ता रकमेतून धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील नुकसानीची सूचना दिलेल्या व पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यात येणार आहेत.

खरीप २०२२ मधील उर्वरित शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा रक्कम मिळावी यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा भारतीय कृषी विमा कंपनीचे महाव्यवस्थापक तथा सहसचिव .सिद्धेश रामसुब्रमण्यम व कृषी विभागाचे प्रधान सचिव  एकनाथ डवले यांच्याशी सातत्याने चर्चा व पाठपुरावा सुरू होता. याचे फलित म्हणून नुकसान भरपाई चा दुसरा टप्पा वितरित होत आहे.

सदरील रक्कम ही पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार असून ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत, त्यांच्याबद्दल धोरण निश्चित करून स्वतंत्र प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना अत्यल्प विमा मिळाला आहे, त्यांचे पंचनामे मिळाल्यानंतर त्याबाबत स्पष्टता घेऊन त्यांना न्याय देण्याच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही निश्चित करण्यात येणार आहे.

            यापूर्वी कधीही एवढ्या लवकर नुकसान भरपाई मिळाली न्हवती. मोठ्या संघर्षानंतर २०२० च्या विम्यापोटी आजवर केवळ रुपये २०१ कोटी मिळाले असून उर्वरित रकमेसाठी लढा सुरू आहे, तर २०२१ चे देखील केवळ रुपये ४०० कोटी मिळाले असून उर्वरित रकमेसाठी लढा सुरू आहे.  परंतु खरीप २०२२ च्या आता मिळणाऱ्या या रु. २०० कोटी मुळे बहुतांश शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी एवढ्या लवकर जवळपास रु. ४५८ कोटी वितरित होत आहेत. हा एक विक्रमच आहे. यातूनही वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय्य भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहणार आहे.

From around the web