गुड न्यूज : खरीप २०२२ पिक विम्याचे आजपासुन वितरण सुरु

 
pik vema

उस्मानाबाद  -  खरीप २०२२ हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी पहिल्या टप्प्यातील पिक विमा सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते. मात्र भारतीय कृषी विमा कंपनीच्या बुलढाणा कार्यालयावर शेतकऱ्यांनी काढलेला मोर्चा, त्यामुळे इतर जिल्हयात बंद ठेवलेली कंपनीची कार्यालये व इतर तांत्रिक अडचणीमुळे यास विलंब झाला. दोन दिवस विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क न झाल्याने आज संपर्क होताच तातडीने विमा वितरण सुरू करण्याच्या सुचना विमा कंपनीच्या क्षेत्रीय व्यावस्थापक श्रीमती शकुंतला शेट्टी यांना देण्यात आल्या असुन आजच रुपये १२७ कोटी व उद्या रुपये १२७ कोटी उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्याच प्रमाणे या विषया संदर्भात जिल्हाधिकारी यांनी जिल्हयातील कंपनीच्या प्रतिनिधीची बैठक घेऊन कार्यालय खुले ठेवण्याच्या लेखी सुचना दिल्या आहेत.त्याप्रमाणे नुकसान भरपाईचे वितरण सुरु झाले आहे.

सततचा पाऊस व हंगामात उद्भवलेल्या इतर नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पुर्वसूचना ऑनलाइन पद्धतीने विमा कंपनीला केल्या होत्या. विमा कंपनीकडून या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानीची टक्केवारी निश्चित करण्यात आली होती. अशा पंचनामे झालेल्या व त्यात नुकसान निष्पन्न झालेल्या पहिल्या टप्प्यातील जवळपास ३.५ लाख शेतकऱ्यांना रुपये २५४ कोटी वितरित करण्यात येणार आहेत. तदनंतर काढणी पश्चात नुकसानीच्या आलेल्या तक्रारी व पिक कापणी प्रयोगातून निष्पन्न झालेल्या नुकसानीनुसार विमा कंपनीकडून दुसऱ्या टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

शिंदे फडणवीस सरकार मुळे शेतकऱ्यांना हक्काची नुकसान भरपाई एवढ्या लवकर मिळत आहे. खरीप २०२१ मधील नुकसानी पोटी देखील प्रत्यक्ष नुकसानीच्या केवळ निम्माच पिक विमा मिळाला असून आणखीन जवळपास रुपये ४०० कोटी मिळणे अपेक्षित असून या रकमेसाठी कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.त्याच प्रमाणे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन पर अनुदानाची दुसरी यादी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात बँकाकडे उपलब्ध होणार असुन लाभार्थ्यांनी प्रमाणिकरण करुन घेतल्या नंतर सहकार विभागाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर रुपये ५० हजाराचे अनुदान वितरित केले जाणार आहे, असे आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. 

From around the web