पिकांच्या नुकसानीची पुर्वसूचना शेतकऱ्यांनी ऑनलाईन पध्दतीने वेळेत करावी

-    जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
 
divegavkar

उस्मानाबाद -  प्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) योजना खरीप 2022 अंतर्गत जिल्हयात मागील काहीं दिवसात झाललेल्या सततच्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे अधिसुचित पिकांचे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी ऑनलाईन पध्दतीने PMFBY - Crop Insurance या मोबाईल अॅपद्वारे नुकसानीची सुचना द्यावी. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकाचे नाव आणि त्याचा गट नंबर योग्य असल्याची खात्री करावी. तसेच पुर्वसूचना दिल्यानंतर अॅपव्दारे मिळणारा डॉकेट आयडी क्रमांक (तक्रार पोहच क्रमांक) पुढील संदर्भासाठी जपून ठेवावा. ऑनलाईन तक्रारीसाठी शेतकऱ्यांनी PMFBY - Crop Insurance हे अॅप गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी केले आहे.

पिकाच्या नुकसानीची पुर्वसूचना विमा कंपनीस प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी संयुक्त पाहणी करतील. नुकसानीची पाहणी करतेवेळी शेतकऱ्यांनी केवळ विमा पावती दाखवणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांनी 7/12, 8-अ, आधारकार्ड, बँकपासबुक आदीं बाबींचा पुरावा (कागदपत्रे) देण्याची आवश्यकता नाही. तसेच हा पंचनामा पिक विमा बाबतच्या कार्यपध्दतीचा भाग असून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क अथवा रक्कम शेतकऱ्यांनी विमा प्रतिनिधींना देण्याची आवश्यता नसते. त्यामुळे विमा प्रतिनिधी जर शेतकऱ्यांना पैशाची मागणी करत असतील तर शेतकऱ्यांनी त्वरीत आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी तक्रार द्यावी. तसेच पीक विमा संदर्भात काही अडचणी असल्यास आपले तालुका विमा प्रतिनिधी यांना संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तिर्थकर यांनी केले आहे.

भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी  पुढीलप्रमाणे – उस्मानाबाद तालुका करीता जितेश जगदाळे (शॉप नं. 3 रेहमान कॉम्लेक्स, पोलिस लाईनसमोर, आनंद नगर) 7030994040, तुळजापूर तालुका करीता महेश सुरवसे (नेताजी नगर, तुळजापूर खुर्द रोड जवळ, तुळजापूर) 9823457249, उमरगा तालुका करीता अक्षय निंबुरगे (शॉप नं.४, द्वारकादास शामकुमार गारमेंट शोरुम, बस स्टँड जवळ, इंद्रा चौक, उमरगा) 9156925705, लोहारा तालुका करीता स्वराज मनसुके (शॉप नं.३, मस्जिद कॉम्लेक्स, स्टेट बँकेच्या पाठीमागे, लोहारा) 7420009044, भूम तालुका करीता काशिनाथ समासे (जुन्या एस.बी.आय.बँकेच्या जवळ, भूम) 9545302115, परंडा तालुका करीता सचिन जगताप (हिरो शोरुम जवळ, परंडा बार्शी रोड, परंडा) 7517775005, कळंब तालुका करीता राहूल चवरे (गंभीरे कॉम्लेक्स तळमजला, सावित्रीबाई फुले हायस्कुल जवळ, कळंब) 8007330021, वाशी तालुका करीता रामेश्वर सुरवसे (देशमुख कॉम्लेक्स, तहसील रोड, वाशी) 9403081038 आणि जिल्हा प्रतिनिधी अमोल मुळे (शॉप नं. 3 रेहमान कॉम्लेक्स, पोलिस लाईनसमोर, आनंद नगर) 9595097710 तसेच बाबासाहेब इनकर (शॉप नं. 3 रेहमान कॉम्लेक्स, पोलिस लाईनसमोर, आनंद नगर) 9850310053 यांच्याशी संपर्क करावा.

From around the web