कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 
as

उस्मानाबाद - जिल्हा परिषद स्वसंपादित योजना 2022-23 अंतर्गत  कडबाकुट्टी, पाणबुडी मोटार संच, एच डी पी ई पाईप संच, व्हर्मी कंपोस्ट बेड, आणि ताडपत्री या योजनांसाठी येथील जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज घेण्याची प्रक्रीया सुरू आहे.तेंव्हा जास्तीत जास्त शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी महेश तीर्थकर यांनी केले आहे.

कडबाकुट्टी- योजनेअंतर्गत १० हजार रुपये,पाणबुडी मोटार संच योजनेअंतर्गत १० हजार रुपये, एच डी पी ई पाईप संच योजनेअंतर्गत प्रती संच १० हजार रुपये, बायोगॅस संयंत्र योजनेअंतर्गत प्रती सयंत्र १७ हजार रुपये, व्हर्मी कंपोस्ट बेड- प्रती बेड १५०० रुपये अनुदान आणि प्रती ताडपत्री २१०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनांसाठी पंचायत समिती कृषी विभाग स्तरावर अर्ज घेणे सुरु आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समिती कृषी अधिकारी आणि विस्तार अधिकारी कृषी यांचेकडे अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२२ असेल. लक्षांकापेक्षा अधिक अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल. बायोगॅस सयंत्र उभा करून कार्यान्वित केल्यावर अनुदान देण्यात येईल.

अर्ज सादर करताना सातबारा आणि 8/अ चा उतारा,बॅंक पासबुक,आधार कार्ड,विहित नमून्यातील अर्ज, जीएसटी खरेदी बिल,कडबा कुट्टी आणि बायोगॅससाठी जनावरे असल्याचा दाखला ही कागदपत्रे जोडावीत तसेच या योजनेची अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीतील कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी कृषी यांच्याशी संपर्क साधावा.

From around the web