महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थींना आवाहन
उस्मानाबाद :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणा-या शेतक-यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे. या योजनेतर्गत जिल्हयामध्ये बँकांनी 71 हजार 740 लाभार्थी शेतक-यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यापैकी जिल्हयातील 607 गावांतील 40 हजार 483 लाभार्थी शेतक-यांची पहिली यादी दि.13 ऑक्टोबर 2020 रोजी योजनेच्या पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. पोर्टलवर अपलोड केलेल्या 71 हजार 740 शेतक-यापैकी अजुन 31 हजार 257 शेतक-याची यादी लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहे.
प्रसिध्द झालेल्या यादीतील 40 हजार 483 शेतक-यापैकी आजअखेर 35 हजार 872 शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. त्याअंतर्गत आज दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 01.30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री, यांच्या अध्यक्षतेखाली आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतक-यांच्या खात्यावर लाभाची रक्कम वर्ग करण्याबाबत कार्यक्रम घेण्यात आला आहे-आणि लाभार्थ्याच्या बचत खात्यावर रक्कम जमा करण्यात आलेली आहे.
तरी लाभार्थी यादीतील ज्या शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यानी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पुर्ण करुन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था उस्मानाबाद यांनी केले आहे.