किमया रेशीम शेतीची... लक्ष्याधीश होण्याची ... 

कळंब तालुक्यातील देवधानोरा गावातील प्रगत  शेतकरी बापु  नहाने यांची यशोगाथा
 
s

रेशीम शेतीच्या माध्यमातून स्वतः आणि इतर शेतकऱ्यांना लखपती बनवण्याचा प्रवास उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका म्हणजे कमी पाणी आणि कोरडवाहू शेती येथे प्रामुख्याने घेणारी  पिके म्हटले तर सोयाबीन, ज्वारी, मुग, हरभरा आणि जेथे थोड्या प्रमाणात पाणी आहे. तेथे उस, गहू, भाजीपाला, फुलशेती इ. पिके घेतात. कोरडवाहू शेती म्हणजे जेमतेम उत्पन्न त्यामध्ये सोयाबीन, ज्वारी  आदी पिके घेऊन उत्पन्न फार कमी अशी शेती  सोडून  देवधानोरा  येथील शेतकरी बापू गजेंद्र नहाने यांनी पारंपारिक शेती सोडून नवीन शेतीचा प्रयोग केला तो म्हणजे रेशीम शेती. त्यासाठी त्यांनी विविध शिबिर, रेशीम कार्यशाळा आणि एक वर्षाचा रेशीम संगोपनाचा कोर्स केला. त्यामध्ये रेशीम अळी तिचे संगोपन कोश कसा निर्माण करायचा आदी पूर्ण ज्ञान रेशीम शेतीबद्दल घेतले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रेशीम शेतीची माहिती घेतली पण ते एकटेच लाभार्थी असल्या कारणामुळे त्यांना लाभ भेटला नाही. इतर शेतकऱ्यांना पण रेशीम शेती बद्दल माहिती सांगितली. त्याच्या मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत माहिती  दिली  पण एकही  शेतकरी तुती लागवड करण्यास तयार झाला नाही. तेव्हा त्यांनी 2013 मध्ये स्वतः एक एकर तुती लागवड केली आणि त्यामधून चांगला नफा मिळवला आणि त्याबाबत इतर शेतकऱ्यांना स्वतः ची रेशीम शेती दाखवून होणाऱ्या फायद्याबाबत माहिती दिली. तेव्हा देव धानोरा गावातील 27 शेतकरी रेशीम घेण्यास तयार झाले. तेंव्हा त्यांना रेशीम शेतीबाबत प्रशिक्षण, प्रात्यक्षिक सर्व बापू नहाने यांनी केले. त्यांना रेशीम प्रशिक्षणासाठी हैदराबाद व बंगलोरला नेले, बाजारपेठेबाबत माहिती दिली.

sd

तेव्हा 2014 या वर्षी एकूण 28 शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रेशीम शेतीचा लाभ घेऊन आजही ते रेशीम शेती करतात आणि वर्षाला एकरी 2 ते 3 लाख रुपये निव्वळ नफा कमावतात आज त्यांची आदर्श शेती पाहून देवधानोरा गावातून 100 शेतकऱ्यांनी तुती लागवड केली आहे. त्यापैकी 65 शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेचा लाभ घेतला. काहीजण पोखरा योजनेतून लाभ घेतात आणि काही बहुभूधारक स्व: खर्चातून रेशीम शेती करून लखपती बनत आहेत.  त्यासाठी बापू गहाने यांनी  देवधानोरा, एकुर्गा, मंगरूळ, शिराढोण अशा 10 गावाची मदत घेऊन आणि नाबार्ड बँकेद्वारे अनुदान घेऊन मायभुमी ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर 3 " कंपनी स्थापन केली आहे. ज्यामध्ये 350 शेतकरी नोंदणीकृत आहेत. त्यांना ते रेशीम शेती, अळी संगोपन आणि इतर पिकाबद्दल मार्गदर्शन करतात.

बापू नहाने यांची रेशीम शेती बाबत माहिती

तुती लागवड व शेड उभारण्यासाठी खर्च : यांनी 22 x 60 फुट 22 फुट रुंदी आणि 60 फुट लांबी असा शेडनेट उभारला. त्यासाठी त्यांना 2 ते 2.5 लाख रुपये खर्च आला.

वर्षामध्ये ते तुतीचे 4 ते 5 लॉट घेतात :

सध्या त्यांचे दोन एकर मध्ये रेशीम लागवड आहे. त्यासाठी V1 ही जात लागवड करतात. अंतर 4x2 फुट असे एकरी 5500 ते 6000 रोपे बसतात. पण चांगले उत्पन घेण्यासाठी एकरी 8000 ते 9000 रोपांची लागवड करतात आणि ते रोप अडीच महिन्यात किटकांना खाण्यासाठी तयार होते व किटकांना 20 दिवस feeding असते.

एक बॅचला 200 ते 250 अंडी  जर घेतली तर त्यामधून 100 ते  125 अंडी घेतली, तर त्यामधून 100 किलो कोष निर्माण होतो, तर ते 200 ते 250 अंडीचे प्रोडेकशन घेतात. त्यामध्ये त्यांना एक बॅचमधून २०० कि.ग्रॅ. कोष होतो. जर सरासरी 40,000 प्रती क्विंटल भाव भेटला, तर त्यांना एक लॉटमध्ये 80 हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. त्यासाठी त्यांना लागणारा खर्च त्यामध्ये रोपे लागवड, खत, खुरपणी, कापणी, कीटक संगोपन यावर होणारा खर्च सरासरी 30 हजार रुपये जर धरला तर एका लॉटमध्ये 80 हजार रुपये उत्पन्न आणि खर्च 30 हजार रुपये म्हणजेच निव्वळ नफा 50 हजार रुपये असे एका वर्षात  4 ते 5 लॉट घेतात. ज्यामधून त्याना एक वर्षामध्ये खर्च वजा जाता निव्वळ नफा दोन ते तीन लाख रुपये होतो. अशी त्यांच्या देवधानोरा आणि एकुर्का या दोन्ही गावांची मिळून वार्षिक दोन कोटी रुपयांची उलाढाल आहे. ज्यामध्ये 100 शेतकरी देवधानोरा व जवळा गावातील 50 ते 60 शेतकरी रेशीम शेती करतात.

बापू गजेंद्र नहाने यांना रेशीम शेती साठी आलेला खर्च:

प्रथम वर्ष खर्च 2014-15:

1 ) तुती शेड उभारणे – 1 लाख रुपये.

2) चंद्रिका – 22 हजार रुपये.

3) तारा बेड व रॅख, चवाळ व मच्छरदानी – 50 हजार रुपये.

4)तुती बेणे एक एकर खर्च – 7 हजार रुपये (5000 ते 6000 बेणे ) एकूण खर्च एक लाख 79 हजार रुपये.

प्रथम वर्षातून मिळालेले उत्पन्न :

एका वर्षात तुतीचे त्यांनी 3 लॉट घेतले

1 ला लॉट – 42 हजार रुपये ( 100 अंडी 100 ते 125 किलो कोष )

2 रा लॉट – 72 हजार रुपये ( 200 अंडी 200 किलो कोष )

3 रा लॉट - 80000 रुपये ( 200 अंडी 200 ते 250 किलो कोष )

असे तीन लॉट मध्ये त्यांना एक लाख 94 हजार रुपये चे 5.5 क्विंटल उत्पादन झाले. त्यामध्ये त्यांना एक लाख 79 हजार रुपये खर्च म्हणजे त्यांचा निव्वळ नफा प्रथम वर्षी 15 हजार रुपये फक्त

रेशीम द्वितीय वर्ष 2015-16:

द्वितीय वर्षामध्ये त्यांनी तुती दोन एकर मध्ये लागवड केली आणि दोन एकर मध्ये त्यांनी 9 लॉट एका वर्षात घेतले. त्यामध्ये प्रत्येकी  एक ते 1.5 महिन्यात एक लॉट असे वर्षात 9 लॉट आणि बाजारपेठ बँगलोर, हैद्राबाद आदी शहरात विकतात.

त्यांना एका लॉटसाठी 10 हजार रुपये खर्च आला. त्यामध्ये खत, रोप छाटणी, पिकाच्या वाढीसाठी टॉनिक, शेड निर्जुंतीकीकरण असा सर्व खर्च त्यामध्ये लागला आणि प्रत्येकी लॉटला सरासरी 35 हजार ते 40 हजार रुपये प्रती क्विंटल त्यांना फायदा झाला, असे त्यांनी वर्षामध्ये 9 लॉट घेऊन त्यांना 7 लाख 50 हजार रुपयांचे उत्पादन झाले. प्रत्येकी लॉट 10 हजार म्हणजे 9 लॉटसाठी त्यांना 90 हजार रुपये खर्च आला. त्यांना द्वितीय वर्षी निव्वळ नफा 6 लाख 60 हजार रुपये इतका झाला.

तृतीय वर्ष :

तिसऱ्या वर्षात पण त्यांनी 9 लॉट घेऊन 90 हजार रुपये खर्च आणि एकूण नफा 6 लाख रुपये झाला. त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून तीन वर्षामध्ये 2 लाख 27 हजार रुपये अनुदान मिळाले होते. असे आज 6 ते 7 वर्षापासून रेशीम शेती करत आहेत आणि वार्षिक दोन एकर क्षेत्रातून 5 ते 6 लाख रुपये दरवर्षी कमवत आहेत. त्याबद्दल इतर शेतकर्यांना पण ते मार्गदर्शन करतात.

- जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद
 

From around the web