सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 59 कोटी 87 लक्ष मंजूर 

शासन निर्णय निर्गमित 
 
news
हे उपोषणाचे यश - खा. उपोषणाचे यश 

उस्मानाबाद - सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 59 कोटी 87 लक्ष मंजूर झाले आहेत. त्यात भूम  तालुक्यासाठी 38 कोटी व परंडा तालुक्यासाठी 15 कोटी 67 लाख व लोहारा तालुक्यासाठी 1 कोटी 21 लक्ष व धाराशिव तालुक्याला 4 कोटी 85 लक्ष  मंजूर झाले आहेत. 


सन 2022 खरीप हंगामाची अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली 59 कोटी व सततच्या पावसाने नुकसान झालेली नुकसान भरपाईची 222.73 कोटी रक्कम तसेच 2020 चा प्रलंबित पीकविमा व 2021 चा उर्वरित 50 टक्के पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ मिळण्यासाठी आमदार कैलास पाटील यांचे उपोषण सुरु होते. 

सन 2022 खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 59 कोटी रक्कमेच्या संदर्भात शासन निर्णय काढणार असल्याचे उपोषण मागे घेताना उपसचिव . धारुरकर व सचिव  आसिम गुप्ता यांनी मान्य केल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगतले होते त्या अनुषंगाने आज दि. 02 नोव्हेंबर 2022 रोजी महसुल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पुर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी वाढीव मदत देणेबाबत शासन निर्णयानुसार जाहीर झाले आहे.

त्यामध्ये जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी मदतीचे वाढीव दर 13 हजार 600 प्रति हेक्टर, बागायत पिकाच्या नुकसानीसाठी मदतीचे वाढीव दर 27 हजार प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकाच्या मदतीचे वाढीव दर 36 हजार प्रति हेक्टर याप्रमाणे 65 हजार 6 शेतकऱ्यांसाठी 59 कोटी 87 लक्ष एवढी रक्कम जिल्ह्यातील एकुण अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वितरीत करणेकरीता शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

            सदरची रक्कम ही भूम तालुक्यासाठी 38 कोटी व परंडा तालुक्यासाठी 15 कोटी 67 लाख व लोहारा तालुक्यासाठी 1 कोटी 21 लक्ष व धाराशिव तालुक्याला 4 कोटी 85 लक्ष  मंजूर झाली आहे. तसेच उर्वरित 222.73 कोटी हे सततच्या पावसाने नुकसान झालेली भरपाई मिळणे बाबत अद्याप मुख्यमंत्री यांनी उपसमितीच्या बैठकीत विषय घेऊन मंजुरी देने आवश्यक आहे, असे खा ओमराजे म्हणाले.     

From around the web