सासरच्या छळास कंटाळून तरुणाची आत्महत्या 

अंबी  पोलीस स्टेशनमध्ये आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 
 
Osmanabad police

अंबी : सासरच्या छळास कंटाळून महिलांनी आत्महत्या केल्याच्या घटना अनेक घडल्या आहेत, पण भूम तालुक्यातील एका तरुणाने सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध  अंबी पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा दखल करण्यात आला आहे. 


प्रभु विठ्ठल शिंदे, वय 30 वर्षे, रा. नळी, ता. भुम यांनी आपल्या नळी शिवारातील शेतात दि. 29.08.2021 रोजी 18.30 वा. सु. आत्महत्या केली होती. माहेरील  लोकांच्या उकसावण्यातून प्रभु यांना टाळून त्यांची पत्नी दोन्ही मुलींसह गावातीलच माहेरी राहत होती. यातूनच सासरकडील रामभाऊ, दत्तू, नवनाथ किसन हराळ या तीघा भावांसह शितल, युवराज, नाना, अंबादास असे हराळ कुटूंबीय व सामनगाव येथील गोरख खटके अशा आठजणांनी प्रभु यांना 29 ऑगस्ट रोजी रामभाऊ हराळ यांच्या घरात कोंडून मारहान केली. 

या छळास कंटाळून प्रभु यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- सुनिल शिंदे यांनी दि. 30 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
मारहाण 

नळदुर्ग पोलीस ठाणे : केशेगाव तांडा, ता. तुळजापूर येथील शंकर धोंडीराम यांना पुर्वीच्या वादावरून दि. 29 ऑगस्ट रोजी 20.00 वा. सु. तांड्यावरील राहत्या घरासमोर ग्रामस्थ- बालाजी सुरेश पवार व हिप्परगा (रवा) येथील शिवाजी ज्ञानु राठो या दोघांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शंकर पवार यांनी दि. 30 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                              

From around the web