आंबीत चोरीच्या स्मार्टफोनसह तरुण अटकेत

 
s

आंबी: स्मार्टफोन चोरी गेल्यावरुन आंबी पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 379 अनुसार दाखल असलेल्या गु.र.क्र. 14 / 2021 च्या तपासादरम्यान पोलीसांनी तांत्रीक तपास करण्याचे ठरवले. यात हा स्मार्टफोन शेळगांव, ता. परंडा येथील राजकुमार विजय दैन, वय 34 वर्षे याच्याजवळ असल्याचे समजले. यावर सपोनि- श्री आशिष खांडेकर, पोना- सिध्देश्वर शिंदे, पोकॉ- राहुल गायकवाड, सतीष राऊत यांच्या पथकाने त्यास नमुद स्मार्टफोनसह आज दि. 3 मे रोजी शेळगांव येथून अटक केली आहे.


चोरी 


आंबी: सचिन किसन भांडवलकर, रा. वाटेफळ, ता. परंडा यांनी त्यांची हिरो एचएफ डिलक्स एम.एच. 12 एसएस 4285 ही दि. 28.04.2021 रोजी 22.00 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती मो.सा. लावल्या जागी न आढळल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या सचिन भांडवलकर यांनी दि. 02 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web