वाशी : दरोड्यातील मुद्देमालासाह चार आरोपी ३६ तासांत अटकेत

 
x

उस्मानाबाद  - वाशी तालुक्यातील विजोरा येथे एका घरावर दरोडा टाकून घरातील लोकांना कोयता, कुऱ्हाड, काठीचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या चार दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ३६ तासास गजाआड करून मुद्देमाल जप्त केला आहे.


विजोरा, ता. वाशी येथील निखील भैरट, भिवा कदम हे दोघे दि. 21- 22.05.2021 दरम्यानच्या रात्री घरासमोरील अंगनात झोपले होते. दरम्यान पाच अनोळखी पुरुषांनी नमूद दोघांना कोयता, कुऱ्हाड, काठीचा धाक दाखवून त्यांच्या जवळील दोन भ्रमणध्वनी व 25,000 ₹ रोख रक्कम लुटली होती. तसेच गावकरी- आप्पा कदम यांच्या घरात घुसून त्यांचाही भ्रमणध्वनी चोरला होता. यावर वाशी पो.ठा. येथे गु.र.क्र. 165 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 395, 457, 380 नुसार दाखल आहे.

            सदर गुन्हा तपासात स्था.गु.शा. चे पोनि  गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि  पांडुरंग माने, पोना- हुसने सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- बबन जाधवर, आरसेवाड, माने यांच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, हा दरोडा 1)अनुज गणेश भोसले, वय 21 वर्षे, रा. डोकेवाडी, ता. भूम 2)सुबराव रंगा शिंदे, वय 30 वर्षे, रा. पिंपळगाव (क), ता. वाशी 3)वैभव एकनाथ शिंदे उर्फ गोलड्या, वय 18 वर्षे, रा. फकराबाद, ता. जामखेड 4)ज्ञानेश्वर लिंगा काळे, वय 21 वर्षे, रा. पांढरेवाडी, ता. परंडा या चौघांनी टाकला आहे.

पोलीस पथकाने नमूद चौघांना काल दि. 22 मे रोजी वेगवेगळ्या ठिकाणांहुन ताब्यात घेउन त्यांच्याकडून या दरोड्यात लुटण्यात आलेला नमूद माल तसेच दरोडा टाकण्यास वापरलेल्या दोन मो.सा. जप्त करण्यात आल्या. त्याशिवाय चौघांकडे अधिक तपासादरम्यान त्यांनी वाशी पो.ठा. गु.र.क्र. 158 / 2021 भा.दं.सं. कलम- 457, 380 या रात्र घरफोडीच्या गुन्ह्यात चोरलेले 24,500 ₹ जप्त करण्यात आले. नमूद आरोपींतील अनुज गणेश भोसले याने घरफोडी करुन वाशी पो.ठा. गु.र.क्र. 285 / 2020 भा.दं.सं. कलम- 457, 380 या गुन्ह्यात चोरलेली 15,000 ₹ रोख रक्कम त्याच्याकडून जप्त करण्यात आली असून पुढील तपास वाशी पोलीस ठाण्यामार्फत केला जाणार आहे.   

From around the web