उमरगा : सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल
उस्मानाबाद : उमरगा येथील 1) दत्तात्रय जाधव 2) दत्तात्रय कुंभार 3) रवि राठोड 4)ईस्माईल चौधरी यांनी उमरगा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 लगत दि. 16 ऑगस्ट रोजी 15.00 ते 19.00 वा. दरम्यान आपापल्या हातगाड्यावरील शेगडीत निष्काळजीपने, धोकादायकपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले. तर उसमानाबाद येथील 1) श्रीकांत कुंभार यांनी याच दिवशी शहरातील टपाल कार्यालयाजवळ आपल्या हातगाड्यावरील शेगडीत धोकादायकपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले व 2) लक्ष्मण भोसले, रा. शेकापुर यांनी उस्मानाबाद शहरातील रस्त्यावर बेदरकारपने व जिवीतास धोकादायकरित्या ऑटोरिक्षा चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले असतांना उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास आढळले.
यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद सहा जणांविरुध्द उमरगा पो.ठा. येथे 4 व उस्मानाबाद (श.) पो.ठा. येथे 2 गुन्हे नोंदवले आहेत.
हाणामारीच्या दोन घटना
परंडा : वडणेर, ता. परंडा येथील कुंडलीक दशरथ चौधरी यांसह त्यांचे भाऊ- सिद्राम, लक्ष्मण यांच्या गटाचा गावकरी- पदमाकर धोंडीबा सरक, शौनक देवकते, संस्कार खांडेकर यांच्या गटातील जुना वाद दि. 16 ऑगस्ट रोजी 11.45 वा. सु. उफाळुन आला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठी, लोखंडी नळीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कुंडलक चौधरी व पदमाकर सरक यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
येरमाळा : उमरा, ता. कळंब येथील संदीप जाधव हे दि. 09 ऑगस्ट रोजी 23.30 वा. आपल्या शेताता होते. यावेळी शेतातील पाणी रस्त्यावर येत असल्याच्या कारणावरुन भागीरथी व मुकूंद जनार्दन जाधव या पती- पत्नींसह त्यांची मुले- करण व मल्लीकार्जुन यांनी संदीप जाधव यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या संदीप जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.