ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांच्या मुसक्या आवळल्या
उस्मानाबाद : अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्राम ,व्हॉटसअप द्वारे मुरुम येथील खंडाप्पा कंटेकुरे यांच्याशी जवळीक, मैत्री साधुन त्यांना महागडया भेट वस्तुंचे आमीष दाखवुन त्यापोटी त्यांना एकुण 45, 42, 104 रुपये सांगितलेल्या बँक खात्यांत वेळोवेळी ऑनलाईन पध्दतीने भरण्यास सांगितले होते. ते पैसे भरल्या नंतर कालांतरांने आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच खंडाप्पा यांनी आत्महत्या केली होती.
यावरुन आनंदनगर पो.ठा येथे गुरनं 41/2020 हा भादसं कलम 306,420 सह आयटी कायदा कलम 66 अंतर्गत दाखल असुन उर्वरीत तपास सायबर पो.ठाच्या श्रीमती अर्चना पाटील या करत आहेत. सायबर पोलीसांनी तांत्रीक विष्लेशण करुन प्राप्त केलेल्या माहितीच्या आधारे आनंद नगर पो.ठाच्या सपोनि शिंदे यांच्या पथकाने नांदेड काराग्रहातील आरोपी मयंक मनोहरलाल शर्मा, मुळ रा.जिल्हा गोरखपुर,उत्तर प्रदेश यास दिनांक 10 ऑगस्ट रोजी अटक करुन उस्मानाबाद सायबर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
दुस-या घटनेत उस्मानाबाद येथील मिल्ली कॉलनीतील अब्दुल हमीद शेख यांनी फेसबुकवर जुनी बुलेट मोटार सायकलची जाहिरात बघुन त्या अज्ञाताशी संपर्क साधला असता त्या अज्ञाताने त्यांच्याकडुन वेळोवेळी एकुण 57,250 रुपये वेगवेगळया बँक खात्यात ऑनलाईन पध्दतीने स्विकारुन शेख यांची फसवणुक केली होती. याप्रकरणी आनंदनगर पो.ठा गुरनं 286/2020 हा दाखल असुन त्याचाही तपास सायबर पो.ठाच्या श्रीमती अर्चना पाटील या करत आहेत. याही प्रकरणी सायबर पोलीसांनी तांत्रीक विष्लेशण केले असता राजस्थानातील अलवार जिल्हयातील प्रदिप मगन मिना याचा हात असल्याचे निष्पन्न झाले होते.या माहितीच्या आधारे आनंद नगर पो.ठाच्या सपोनि काकडे यांच्या पथकाने राजस्थानात जावुन प्रदिप यास दिनांक 10 ऑगस्ट रोजी ताब्यात घेवुन उस्मानाबाद सायबर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.