चार गुन्ह्यांतील दोन पाहिजे आरोपी अटकेत

 
Osmanabad police

उस्मानाबाद - परंडा पो.ठा. 25 / 2018 या दरोड्याच्या गुन्ह्यासह परंडा 121 / 2021 या मारहानीच्या तसेच आनंदनगर पो.ठा. 154 / 2021 या चोरीच्या गुन्ह्यात कांतीलाल दत्तु पवार, रा. सावधरवाडी, ता. परंडा हे पोलीसांना पाहिजे (Wanted) होते. ते मुळ गावी आल्याची खबर मिळताच आंबी पो.ठा. च्या पथकाने त्यांना आज दि. 21 जुलै रोजी अटक करुन परंडा पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे. 

तर येरमाळा पो.ठा. 37 / 2020 या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी- सतिश राजाभाउ नाकाते, रा. कळंब हा स्था.गु.शा. च्या पथकास आज ईद बंदोबस्त गस्ती दरम्यान कळंब येथे आढळल्याने त्यास अटक करुन येरमाळा पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

गुरांची क्रुरपने वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

तुळजापूर : तुळजापूर पो.ठा. चे पथक दि. 20 जुलै रोजी 08.45 वा. सु. सांगवी (मा.) शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर गस्त करत होते. यावेळी त्यांनी टाटा एस वाहन क्र. एम.एच. 25 पी 2042 हे थांबवून तपासणी केली असता वाहनातील ज्ञानेश्वर नागनाथ कोकाटे व नासरउद्दीन मोईजउद्दीन सय्यद, दोघे रा. उस्मानाबाद हे बैलांना दाटीवाटीने व चारा- पाण्याची व्यवस्था न करता क्रुरपने वाहतुक करत असल्याचे आढळले. यावरुन पोलीस कॉन्स्टेबल- संतोष पवार यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन पशु क्रुरता प्रतिबंधक कायदा कलम- 11 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 चोरी

उस्मानाबाद :  भुम येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील इनव्हर्टर च्या दोन बॅटऱ्या दि. 16- 19 जुलै दरम्यान अज्ञाताने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या वैद्यकीय अधीक्षक- संदीप जोगदंड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तर दुसऱ्या घटनेत धानुरी, ता. लोहारा येथील मेघराज साळुंके यांनी नुकतीच खरेदी केलेली होन्‌डा युनिकॉर्न मोटारसायकल तात्पुरता नोंदणी क्र. एम.एच. 25 टीसी 0051 ही  घराबाहेर ठेवली असतांना दि. 19- 20 जुलै दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेली. यावरुन लोहारा पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

  मारहाण 

उमरगा : एकोंडी (ज.), ता. उमरगा येथील गजेंद्र येवते हे दि. 19 जुलै रोजी 16.30 वा. एकोंडी शिवारातील बटाईने कसत असलेल्या आपल्या शेतात म्हैस चारत होते. यावेळी बांधा शेजारचे शेतकरी- गुलचंद व विशाल पुजारी या मद्यधुंद पिता- पुत्रांनी म्हैस चारण्यास आक्षेप घेउन गजेंद्र येवते यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कंबर पट्ट्याने व दगडाने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या गजेंद्र येवते यांनी दि. 20 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web