उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 

परंडा: खानापुर, ता. परंडा येथील भाग्यवंत बळीराम परिहार हे कुटूंबीयांसह 12 मार्च रोजी 17.30 वा. सु. जामगाव गट क्र. 33/ब मधील शेतातील पिकाची काढणी करत होते. यावेळी शेतजमीनीच्या जुन्या वादावरून गावकरी- भास्कर व सिध्दार्थ गजरमल या दोघा पिता- पुत्रांनी भाग्यवंत यांसह त्यांच्या कुटूंबीयांस शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देउन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शेतातील गोठ्यास आग लावून व बैलगाडीचे चाक मोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या भाग्यवंत परिहार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435, 427, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 वाशी: जवळका, ता. वाशी येथील किसन, सुसाबाई, हनुमंत, कृष्णा या गायकवाड कुटूंबीयांचा शेजारील- संजुबाई कसबे यांच्याशी 10 मार्च रोजी 14.00 वा. सु. राहत्या गल्लीत रस्त्यावर गाडी लावण्याच्या कारणावरुन वाद झाला. यात नमूद गायकवाड कुटूंबीयांनी संजुबाई कसबे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली व लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. यावरुन संजुबाई कसबे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सार्वजनिक ठिकाणी गाड्यावर निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यावर गुन्हा दाखल

कळंब: कळंब येथील दलपतसिंह समानसिंग राठोड यांनी 12 मार्च रोजी होळकर चौक, कळंब येथील रस्त्यावर मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपणे हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत केला. यावरुन पोलीसांनी सरकातर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 285 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

 
सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे वाहन उभे करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

 परंडा: उस्मानाबाद येथील संभाजी हरिश्चंद्र माळी यांनी 12 मार्च रोजी महिंद्रा पिकअप क्र. एम.एच. 13 सीयु 6298 हा परंडा येथील रस्त्यावर वाहतुकीस कोंडी व मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा धोकादायक अवस्थेत उभा केला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web