भूमध्ये चोरीच्या चार  मोटारसायकलसह दोघे अटकेत

 
s

भूम : चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा शोध घेण्यासाठी भुम उपविभागीय पोलीस अधिकारी- विशाल खांबे, भुम पो.ठा. चे पोनि-  रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- साळवे, पोउपनि- गडवे, पोलीस अंमलदार- गोलेकर, जानराव, सोनार, गावंडे यांचे पथक शोध घेत होते.

दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खर्डा, ता. जामखेड येथील आकाश शिवाजी पवार व अजय चंद्रकांत काळे उर्फ सोन्या यांना आज दि. 06 ऑगस्ट रोजी भुम परिसरातून ताब्यात घेतले असता त्यांनी 8 मोटारसायकल या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने त्या मोटारसायकल ताब्यात घेउन त्यांचे सांगाडा- इंजिन क्रमांक पडताळले असता त्यातील 4 मोटारसायकल या चोरीस गेल्यापैकी असून त्यावरुन भुम पो.ठा. गु.र.क्र. 118, 139 / 2021 , उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. गु.र.क्र. 118 / 2020 तसेच बार्शी शहर पो.ठा. गु.र.क्र. 156 / 2021 दाखल असल्याचे समजले. 

उर्वरीत 4 मोटारसायकलचा  ताबा- मालकी विषयी ते दोघे असंदिग्ध्द माहिती देत असल्याने त्या 4 मोटारसायकल या चोरीच्याच असल्याचा पोलीसांना संशय आहे. नमूद 8 मोटारसायकल जप्त करुन त्या दोघांना अटक करण्यात आली असून उर्वरीत 4 मो.सा. विषयी तपास केला जात आहे.

From around the web