चोरीच्या शेत मालासह दोन आरोपी अवघ्या 24 तासांत अटकेत

 
s

उस्मानाबाद : राम श्रीरंग तोरमकर, रा. गावसुद, ता. उस्मानाबाद यांच्या शेतातील गोठ्यातून 6 पोती भुईमुग, 20 पोती उडीद व एक टार्पोलीन असा माल दि. 28- 29 जुलै दरम्यानच्या रात्री चोरीस गेला होता. यावरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गु.र.क्र. 188 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 379 नुसार दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पोनि- सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखालील पोहेकॉ- मुल्ला, पोना- लियाकत पठाण, पोकॉ- जाधव यांनी गतीमान तपास करुन प्राप्त माहितीच्या आधारे गावकरी- सुनिल रघु पवार, हरी किसन पवार यांना दि. 29 जुलै रोजी ताब्यात घेउन नमूद चोरीचा माल त्यांच्या ताब्यातून जप्त केला आहे. 

दहा वर्षापासुन पाहिजे (Wanted) असलेला आरोपी अटकेत

आंबी : पिंपरी (आ.), ता. परंडा येथील गणेश महादेव मुळे हा आंबी पो.ठा. गु.र.क्र. 12 / 2011 भा.दं.सं. कलम- 306, 109 सह सावकारी कायदा कलम- 32 (ब) या गुन्ह्यात पोलीसांना गेली दहा वर्षांपासून हवा होता. त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने पोलीस त्याच्या मागावर असतांना आंबी पो.ठा. च्या सपोनि- आशिष खांडेकर यांच्या पथकास तो गावी आल्याची खबर मिळताच पथकाने काल दि. 29 जुलै रोजी त्यास अटक केली आहे.


सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपने वाहन उभे करणाऱ्या दोन चालकांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद: 1) नागनाथ सखाराम सावंत, रा. मुरुम, ता. उमरगा यांनी दि. 29 जुलै रोजी 12.30 वा. ॲटोरिक्षा क्र. एम.एच. 25 पी 326 हा मुरुम येथील चौकात सार्वजनिक रस्त्यावर तर 2) सरताज आझाद शेख, रा. बावची, ता. परंडा यांनी 15.30 वा. ॲपे मॅजीक वाहन क्र. एम.एच. 25 एजे 3036 हा सोनारी येथील चौकात सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या उभा करुन भा.दं.सं. कलम-283 चे उल्लंघन केले.

यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द अनुक्रमे मुरुम व आंबी पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

 
रात्रगस्ती दरम्यान संशयीत ताब्यात

मुरुम -  मुरुम पो.ठा. चे पथक दि. 29.07.2021 रोजी 01.30 वा. सु. येणेगुर शिवारात रात्रगस्तीस असतांना मुरुम मोड येथील अंधारात एका दुकानाजवळ अल्लाबक्ष गफुरसाब आफगान, वय 34 वर्षे, रा. मटकी, ता. आळंद, राऱ्य- कर्नाटक हा आपले अस्तित्व लपवून संशयास्पदरीत्या थांबलेला आढळला. अशा अवेळी तेथे उपस्थित असण्याच्या कारणांबाबत पथकाने त्यांस विचारले असता तो असंबध्द माहिती देत असल्याने त्यास अटक करुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम- 122 (क) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web