ट्रक लुटणारे दोघे आरोपी मुद्देमालासह अटकेत

उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश 
 
ट्रक लुटणारे दोघे आरोपी मुद्देमालासह अटकेत

नळदुर्ग: चालक -अस्लम फुलारी, रा. बसवकल्याण यांचा  20 मेट्रीक टन गहु असलेला ट्रक क्र. के.ए. 56-5541 हा  5 एप्रिल रोजी 05.00 वा. बसवंतवाडी फाटा येथे दोन मोटार सायकलवरील अज्ञात चौंघा पुरुषांनी अडवला होता. यावेळी त्या चौघांनी चालक-फुलारी यांना रस्त्याबाजुच्या शेतात ओढत नेउन लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्यांच्या जवळील मोबाईल फोन, 30,000 रु. रोख रक्कम व  ट्रक घेउन पोबारा केल्याने भा.दं.सं. कलम- 394, 34 अंतर्गत नळदुर्ग गु.र.नं. 103/2021 हा दाखल आहे.

तपासा दरम्यान स्थागुशाच्या पोनि गजानन घाडगे यांच्या पथकातील पोउपनि -पांडुरंग माने, पोशि- ढगारे, आरसेवाड, मारलापल्ले, कावरे यांनी गुन्हयाची कार्यशैली अभ्यासली.  अखेरीस अशोक गोपिनाथ काळे, वय 42 वर्षे, रा. तेरखेडा, महादेव रामभाउ माळी, वय 40 वर्षे, रा. आळणी यांना उस्मानाबाद शहराबाहेरील महामार्गा वर सापळा लावुन आज दि. 09 एप्रिल रोजी ताब्यात घेतले.  नमुद लुटलेल्या  ट्रकची मागील 6 चाके व लुटीसाठी वापरलेले बोलेरो वाहन क्र. एम. एच. 25 आर 4606 व  टाटा-एस  वाहन क्र. एम. एच. 42 एक्यु 1120 हे नमुद दोघा आरोपींच्या ताब्यातुन जप्त करण्यात आले असुन त्यांना उर्वरीत तपास कामी पो. ठा. नळदुर्ग येथे हस्तांतरीत करण्यात आले आहे

From around the web