दरोड्याच्या गुन्ह्यातील तुळजापूरचा आरोपी ताब्यात

 
दरोड्याच्या गुन्ह्यातील तुळजापूरचा आरोपी ताब्यात

उस्मानाबाद -  विठ्ठल आमाक पारधे, वय 28 वर्षे, रा. काटगाव, ता. तुळजापूर हा नळदुर्ग पो.ठा. गु.र.क्र. 310 / 2020 भा.दं.सं. कलम- 395, 120 (ब) या दरोड्याच्या गुन्ह्यात तपासकामी हवा होता. तो राहत्या ठिकाणी मिळून येत नसल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. स्था.गु.शा. चे पोनि  गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- निलंगेकर, पोहेकॉ- काझी, पोना- संतोष गव्हाणे, पोकॉ- अशोक ढगारे यांच्या पथकाने त्यास राहत्या परिसरातून काल 14 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी नळदुर्ग पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

 शिराढोण  रंगनाथ रामदास आडे, रा. लमाण तांडा, शिराढोन, ता. कळंब हे 14 मार्च रोजी राहत्या परिसरात एका कॅनमध्ये 7 लि. गावठी दारु ( किं.अं. 440 ₹) बाळगले असतांना शिराढोन पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी गावठी मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मनाई आदेश झुगारुन निष्काळजीपणाचे कृत्य करणाऱ्यांवर पोलीसांतर्फे गुन्हा दाखल

उस्मानाबाद - . जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाने उस्मानाबाद जिल्ह्यात दि.14.03.2021 रोजी जनताकर्फ्यु जाहीर असतांना 1)जोहरा शिराज शेख 2)कलिमोद्दीन जियावोद्दीन शेख 3)बाबुलाल रजाक शेख, तीघे रा. उस्मानाबाद यांनी हुसेनपुरा व गणेशनगर, उस्मानाबाद येथे सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या व इतरांच्या जिवीतास कोविड- 19 संसर्गाचा धोका निर्माण होउ शकेल असे निष्काळजीपणाचे कृत्य केले. यावरुन सपोनि- शंकर सुर्वे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web