उस्मानाबाद, आष्टा (कासार) येथे चोरीचे तीन गुन्हे 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : श्रीराम जिंतुरकर, रा. संजीवनी ईस्पीतळाजवळ, उस्मानाबाद यांच्या इमारतीच्या छतावरुन कृष्णा दत्तात्रय जाधव, वय 27 वर्षे, रा. चिलवडी, ता. उस्मानाबाद याने दि. 14 ऑगस्ट रोजी 00.30 वा. सु. वरील मजल्यावरील घरात प्रवेश करुन कपाट- टेबल उघडून त्यातील साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या जिंतुरकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380, 511 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम : आष्टा (कासार), ता. उमरगा येथील संजय शिंदे, राजेंद्र शिंदे व सुधीर सोलापुरे यांच्या आष्टाकासार शेतातील तीन गायी दि. 11- 12 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या संजय शिंदे यांनी दि. 14 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : आशा मुंढे, रा. वडगाव (ज.) ता. कळंब या दि. 14 ऑगस्ट रोजी 14.15 वा. सु. उस्मानाबाद बसस्थानकातील बसमध्ये चढत असतांना अज्ञाताने गर्दीचा फायदा घेउन मुंढे यांच्या पिशवीतील 16 ग्रॅम सुवर्ण दागिने व चांदीचे चैन असलेली पर्स चोरुन नेली. अशा मजकुराच्या आशा मुंढे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपघात

वाशी : दत्तात्रय भिमराव चव्हाण, वय 39 वर्षे, रा. पारगांव, ता. वाशी हे मोटारसायकल क्र. एम.एच. 12 केजी 9417 ही दि. 08 ऑगस्ट रोजी 14.00 वा. सु. इंदापुर फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने ट्रक क्र. ए.पी. 28 टीबी 7457 ही निष्काळजीपने चालवून दत्तात्रय चव्हाण चालवत असलेल्या मो.सा. ला पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद ट्रकचा अज्ञात चालक जखमीस वैद्यकीय उपचाराची तजवीज न करता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता अपघातस्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- अभिजीत दत्तात्रय चव्हाण यांनी दि. 14 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134, 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web