उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात तीन ठार
वाशी : सुनिल सर्जेराव शेलार, वय 49 वर्षे, रा. काटेगाव, ता. बार्शी हे दि. 20 ऑगस्ट रोजी 20.00 वा. सु. पार्डी फाटा येथील उड्डानपुलावरुन मोटारसायकलने प्रवास करत होते. दरम्यान अज्ञात चालकाने क्रुझर वाहन क्र. एम.एच. 24 व्ही 4705 ही निष्काळजीपने चालवून सुनिल शेलार यांच्या मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद क्रुझरचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह निघून गेला. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- मनोज सर्जेराव शेलार यांनी दि. 21 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : बाळु आश्रुबा बोबडे, वय 29 वर्षे, रा. सारोळा (मां.), ता. वाशी हे दि. 17 ऑगस्ट रोजी 19.00 वा. सु. हावरगाव शिवारातील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एसी 7385 ही चालवत जात होते. दरम्यान अज्ञात चालकाने कार क्र. एम.एच. 25 आर 8572 ही निष्काळजीपने चालवून बाळु बोबडे यांच्या मो.सा. ला समोरुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद कारचा अज्ञात चालक घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- श्रीमंत आश्रुबा बोबडे यांनी दि. 21 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : अज्ञात चालकाने दि. 16 ऑगस्ट रोजी 21.00 वा. सु. भंडारी येथील लातुर ते तुळजापूर रस्त्यावर बस क्र. एम.एच. 40 एन 9743 ही निष्काळजीपने चालवून रस्त्याने पायी जाणाऱ्या भंडारी येथील राजाबाई लक्ष्मण कांबळे यांना पाठीमागून धडक दिल्याने त्या गंभीर जखमी होउन मयत झाल्या. या अपघातानंतर नमूद बसचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन बससह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- धमेंद्र लक्ष्मण कांबळे यांनी दि. 21 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अपघातास कारणीभुत 1,500 ₹ दंड
उमरगा : निष्काळजीपने वाहन चालवून अपघाताद्वारे मानवी दुखापतीस कारणीभुत ठरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 चे उल्लंघन केल्याबद्दल गोविंद बळीराम चव्हाण, रा. उमरगा यांना 1,500 ₹ दंडाची व दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उमरगा यांनी काल दि. 21 ऑगस्ट रोजी सुनावली आहे.