उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

दोन ठिकाणी चोरीच्या घटना 
 
उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल

तामलवाडी: गोकुळ हरीदास शिंदे, रा. सावरगाव ता. तुळजापुर हे 11 एप्रिल रोजी 21.00 वा. बस थांबा येथे होते. यावेळी भाउबंद उमेश, सतिश, गणेश शिंदे यांनी शेतातील बांधावील लिंबाचे झाड काढण्याचे कारणावरुन गोकुळ यांना शिवीगाळ करुन लाकडाने व दगडाने मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या गोकुळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 324, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 तामलवाडी : नुरमहमद पापालाल सय्यद, रा. देवकुरळी ता. तुळजापुर हे 12 एप्रिल रोजी 10.00 वा.  गावातील मस्जिद समोरुन मो. सा. वर जात होते. यावेळी गावकरी ईसाक, परवेज, रियाज शेख, तिघे रा. देवकुरळी, व नवाजबी, असिफाबी, अफरोज, सुरज पठाण सर्व रा. मंगरुळ यांनी जुन्या वादावरुन नुरअहमद यांची मो. सा. आडवुन  त्यांना शिवीगाळ केली. नुरमहमद यांच्या मुलास खाली ओढुन लोखंडी पाईपने व काठीने मारुन जखमी केले.  तसेच नुरमहमद यांच्या पत्नीस लाथाबुक्याने मारहाण करुन एक दात पाडला. अशा मजकुराच्या  नुरमहमद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम  143, 147, 148, 149, 341, 325, 324, 323, 504, 188, 269  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद - शमशेद्दीन अब्दुल पठाण, रा. सुलतानपुरा, उस्मानाबाद हे 12 एप्रिल रोजी 12.45 वा. आक्सा पानटपरी येथे सुट्टे पैसे घेण्यासाठी गेला होता. यावेळी पानटपरीतील दोन अज्ञात मुलांनी छिटा सुपारीचे कारणावरुन शिवीगाळ करुन फरशीच्या तुकडयाने डोकीत मारुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शमशेद्दीन यांनी दि. 12 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 324, 323, 504, 506, 34  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


दोन ठिकाणी चोरी 

उमरगा : आनंद आंबादास कुलकर्णी रा. आष्टा जहागिर यांच्या शेतात बसवलेले सोलार पॅनल 20,000 रु. किंमतीचे अज्ञाताने 11-12 एप्रिल च्या दरम्यान चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : जालींदर गोरख तळेकर रा. विजोरा ता. वाशी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलुप  अज्ञाताने 12 एप्रिल रोजी पहाटे तोडुन त्यांचे व त्यांचे भावाचे घरातील 6,76,000 रु. किंमतीचे दागीने व रोख रक्कम चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web