उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल

उस्मानाबाद : पवारवाडी, ता. उस्मानाबाद येथील मनिषा सदाशिव मुंढे या 31 मार्च रोजी 20.30 वा. सु. घरी होत्या. यावेळी केबलच्या वादावरुन भाऊबंद- सविता मुंढे, विठ्ठल मुंढे, विकास मुंढे, आकाश मुंढे या चौघांनी मनिषा यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन मुक्कामार दिला. तसेच मनिषा यांच्या अंगावरील 18,000 ₹ किंमतीचे दागिने सविता यांनी काढून घेतले. अशा मजकुराच्या मनिषा मुंढे यांनी 02 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 327, 452, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा: त्रिकोळी, ता. उमरगा येथील बळीराम शिवाप्पा मडोळे हे त्यांची पत्नी- मंगलबाई यांसह 02 एप्रील रोजी 17.00 वा. सु. त्रिकोळी गट क्र. 50/02 मधील शेतात होते. यावेळी शेत रस्त्याच्या कारणावरुन गावकरी साळवे कुटूंबातील पांडुरंग, दिगंबर, दत्तात्रय, महादेव, ओम, सिंध्दु, बसवंत या 7 जणांनी नमूद पती- पत्नीस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कत्ती, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या बळीराम मडोळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 143, 147, 148, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद - मोहन सुदाम गादेकर, रा. सोनेगाव, ता. उस्मानाबाद यांना 02 एप्रील रोजी सोनेगाव येथे गावकरी- समाधान गोफने, ज्ञानेश्वर माने, जयसिंग माने यांनी राजकीय वैमनस्यातून शिवीगाळ-धक्काबुक्की करुन कुऱ्हाडीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या मोहन गादेकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

2 गुन्ह्यातील 2 आरोपींना आर्थिक दंडाची शिक्षा

वाशी: दशरथ पंढरीनाथ बुरंगे, रा. घाटनांदुर, ता. भुम यांनी घाटनांदुर शिवारातील आरती ढाब्यासमोर मानवी जिवीतास धोका होईल अशा निष्काळजीपणे आपल्या हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम-  285 चे उल्लंघन केले होते. या प्रकरणी त्यांना 1,000 ₹ दंडाची व दंड न भरल्यास 5 दिवस साध्या कारावासाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वाशी यांनी आज 3 एप्रील रोजी सुनावली आहे.

उस्मानाबाद -  विठ्ठल रामभाऊ खरे, रा. उस्मानाबाद यांनी चहा हॉटेल व्यवसायास चालू ठेउन कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण करण्याची घातक कृती करुन भा.दं.सं. कलम- 269 चे उल्लंघन केले. या प्रकरणी त्यांना 100 ₹ दंडाची व दंड न भरल्यास 3 दिवस साध्या कारावासाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी आज 3 एप्रील रोजी सुनावली आहे.

From around the web