उमरग्यात गांजा सेवन करणाऱ्या तिघांना अटक 

 
s

उमरगा  : उमरगा पो.ठा. चे पथक दि. 25 ऑगस्ट रोजी दुपारी शहरात गस्तीस असतांना बसस्थानकासमोरील जुन्या शाळेच्या आवारात असलेल्या तीन जणांच्या टोळक्यास पोलीसांनी हटकले. यावेळी नरेश याटे, महेंद्र गौड, इम्रान गुलफरोश हे तीघे छोट्या पुडीत अवैधरित्या गांजा हा अंमली पदार्थ बाळगुन चिलीमद्वारे गांजा सेवन करत असल्याचे आढळले. यावरुन पोलीस नाईक- अतुल जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन एनडीपीएस कायदा कलम- 8, 27 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद : अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय माहितीच्या आधारे उमरगा पो. ठा. च्या पथकाने काल दि. 25 ऑगस्ट रोजी 19.40 वा. सु. हद्दीतील एकुरगा येथे तीन वेगवेगळे छापे मारले. यात एकुरगा ग्रामस्थ- 1) अलिम लायक पटेल हे गावातील चायनीज सेंटरच्या बाजूस देशी- विदेशी दारुच्या 37 बाटल्या बाळगलेले तर 2)संजय कार्तीक कांबळे हे आपल्या राहत्या घराजवळ 10 लि. गावठी दारु बाळगलेले तर 3)सुनंदा कांबळे या आपल्या राहत्या घराजवळ देशी दारुच्या 16 बाटल्या बाळगलेल्या आढळल्या. तसेच कनगरा ग्रामस्थ- सतीश गुंड हे दि. 24 ऑगस्ट रोजी पाडोळी येथील आपल्या ढाब्यात अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 15 बाटल्या बाळगले असतांना बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले. तर वाटेफळ ग्रामस्थ- रामचंद्र निवृत्ती पाबळे हे दि. 25 ऑगस्ट रोजी वाटेफळ शिवारात एका कापडी पिशवीत देशी दारुच्या 13 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले अंबी पो.ठा. च्या पथकास आढळले.  यावरुन नमूद सर्वांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवले आहेत.
 

From around the web