चोरीच्या विद्युत पंपासह तीन आरोपी 24 तासांत अटकेत

 
s

शिराढोण  :  रांजणी, ता. कळंब येथील नरसिंग पानढवळे यांच्या शेत विहिरीतील 3 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप दि. 15- 16 ऑगस्ट रोजीच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याने दि. 17 ऑगस्ट रोजी भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

            तपासादरम्यान शिराढोन पो.ठा. च्या सपोनि-  वैभव नेटके यांच्या सह पोउपनि- श्री. गोडसे, तांबारे, पोना- पठाण, कलशेट्टी, तोटावार, पोकॉ- तारळकर, घोडके, लाकाळ यांनी गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करुन व गोपनीय माहिती आधारे ग्रामस्थ- 1) बालाजी मोतीराम सोनपारखे 2) नानासाहेब शहाजी सोनपारखे 3) धनाजी दादाराव सोनपारखे यांना आज दि. 18 ऑगस्ट रोजी ताब्यात घेउन नमूद विद्युत पंप त्यांच्या ताब्यातून जप्त केला आहे. 


सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यास 500 ₹ दंड

उस्मानाबाद  : सार्वजनिक ठिकाणी हातगाड्यावर निष्काळजीपने व धोकादायरित्या अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन करणाऱ्या उस्मानाबाद येथील दिलीप भुजंग तांबे यांना 500 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी आज दि. 18 ऑगस्ट रोजी सुनावली आहे.

सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने, धोकादायरित्या वाहन चालवणाऱ्या चौघांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद  : कळंब येथील 1) बसीर शब्बीर शेख 2) बाशीद युसूफ पठाण यांनी कळंब येथील  सार्वजनिक रस्त्यावर दि. 17 ऑगस्ट रोजी आपापल्या ताब्यातील चारचाकी वाहने बेदरकारपने व जिवीतास धोकादायकरित्या चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले. तर उमरगा येथील 3) धम्मदिप देवीदास सुर्यवंशी 4) शिवराज शंकर माळी यांनी याच दिवशी उमरगा येथील महामार्गावर आपापल्या ताब्यातील ऑटोरिक्षे बेदरकारपने व जिवीतास धोकादायकरित्या चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद चौघांविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web