उस्मानाबादेत स्मार्टफोनसह चोरटा अटकेत 

 
s

उस्मानाबाद  -   गोपनीय खबरेच्या आधारे स्थागुशाच्या  पोनि-गजानन  घाडगे  यांच्या  मार्गदर्शनाखाली पोउपनि- भुजबळ ,पोहेका- काझी, पोका-सर्जे, साळुंके,पोना-कावरे, पोकॉ ठाकूर यांच्या पथकाने गोपनीय माहिती आधारे  दि 28.06.2021 रोजी जुना बस डेपो, उस्मानाबाद येथुन सचिन जिगनु पवार यास ताब्यात घेतले. यावेळी आनंदनगर पोठा गुरनं 95/2021 या चोरीच्या गुन्हयातील स्मार्टफोन आढळल्याने पथकाने त्यास पुढील कार्यवाहीस आनंदनगर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

  उल्लेखनिय कार्य करणा-या पोलीस अधिकारी-अंमलदारांचा सत्कार 

गुन्हा तपासा दरम्यान उललेखनिय कार्य करणा-या सपोनि-मनोज निलंगेकर, पोउपनि-पांडुरंग माने, पोहेकॉ-निव़त्ती  बोळके, पोना- सिध्देश्वर शिंदे, राहुल गायकवाड, दयानंद गादेकर, पोकॉ- रविंद्र आरसेवाड, अशोक ढगारे यांचा आज  दिनांक 29 जुन रोजी पोलीस मुख्यालयात मा.पोलीस अधीक्षक श्री. राजतिलक रौशन यांच्या हस्ते  प्रशस्तीपत्र, पुश्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला.

From around the web