उस्मानाबाद, तुळजापूर, पोहनेर, समुद्राळ, ढोकी येथे चोरीची घटना 

 
Osmanabad police

लोहारा  : समुद्राळ येथील साखर कारखान्याच्या भांडार गृहाचे शटर दि. 19 ऑगस्ट रोजी पहाटे अज्ञाताने उचकटून आतील 7,77,555 ₹ किंमतीचे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या कारखाना सामान्य प्रशासन विभागाचे व्यवस्थापक- संजीव गुरव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : तालीम गल्ली उस्मानाबाद येथील मोहसीन सय्यद यांची घरासमोरील हिरो पॅशन मो.सा. क्र. एम.एच. 25 एएस 5787 ही दि. 16 ऑगस्ट रोजी 15.30 वा. सु. अज्ञाताने चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : मंकावती गल्ली, तुळजापूर येथील चेतन पतंगे यांची हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 एसी 3288 ही दि. 11 ऑगस्ट रोजी 21.00 ते 22.30 वा. सु. अज्ञाताने नवीन बसस्थानकाजवळील गल्लीतून चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : पोहनेर, ता. उस्मानाबाद येथील देविदास धावारे यांच्या शेत गट क्र. 287 मधील पिकास पणी देण्यासाठी अंथरलेले तुषारसिंचन संचातील 5 नोजल व 1 कोपरी दि. 18- 19 ऑगस्ट रोजीच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या धावारे यांनी दि. 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : वैशाली क्षिरसागर, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद या दि. 19 ऑगस्ट रोजी 14.15 वा. सु. उस्मानाबाद बसस्थानक येथील बसमध्ये चढत असतांना अज्ञाताने गर्दीचा फायदा घेउन त्यांच्या पिशवीतील 35 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दिगिने व 2,000 ₹ रोख रक्कम असलेली पर्स चोरुन नेली. अशा मजकुराच्या वैशाली क्षिरसागर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web