उस्मानाबाद आणि सारोळा येथे चोरीची घटना 

 
उस्मानाबाद आणि सारोळा येथे चोरीची घटना

उस्मानाबाद: चंद्रकांत रामभाऊ वेदपाठक, रा. उस्मानाबाद यांच्या बावी शिवारातील शेत विहीरीतील गंगोत्री कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप व 40 फुट वायर दि. 08- 09.05.2021 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या चंद्रकांत वेदपाठक यांनी दि. 16 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 ढोकी: प्रशांत श्रीमंत लाकाळ, रा. सारोळा (भि.), ता. उस्मानाबाद यांच्या छताचा पत्रा अज्ञात व्यक्तीने दि. 15- 16.05.2021 दरम्यानच्या रात्री उचकटून घरातील सुवर्ण दागिने व 25,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रशांत लाकाळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 45 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाया

 उमरगा: अवैध मद्य विक्रीच्या खबरेवरुन उमरगा पो.ठा. च्या पथकाने दि. 15 मे रोजी नाईचाकुर, ता. उमरगा येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यात शरद अंकुश पवार हे ‘शरद किराणा दुकान’ समोर 180 मि.ली. देशी दारुच्या 13 बाटल्या बाळगलेले तर दुसऱ्या घटनेत दत्ता विश्वनाथ मकाळे हे आपल्या राहत्या घरासमोर 10 लि. गावठी दारु बाळगलेले असतांना पथकास आढळले.

 आंबी: सोमनाथ विराजी सुपेकर, रा. तांदुळवाडी हे दि. 16 मे रोजी आपल्या राहत्या घरामागे अवैध विक्रीच्या उद्देशाने विदेशी दारुच्या 19 बाटल्या बाळगलेले असतांना आंबी पो.ठा. च्या पथकास आढळले.           यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web