उस्मानाबाद, सुरतगाव, मुरूम,कळंब येथे चोरीची घटना 

 
Osmanabad police

तामलवाडी : सुरतगाव, ता. तुळजापूर येथील सुहास छबु गुंड हे दि. 18 ऑगस्ट रोजी 10.00 ते 13.30 वा. दरम्यान कुटूंबीयांसह शेतात गेल्याची संधी साधून अज्ञाताने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतील 33 ग्रॅम सुवर्ण दागिन्यांसह  10 ग्रॅम वजनाचे चांदिचे पैंजन व 35,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुहास गुंड यांनी दि. 18 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : प्रादेशीक परिवहन कार्यालयासमोरील ‘मैत्री ऑनलाईन सर्विस सेंटर’ चा पत्रा अज्ञात व्यक्तीने दि. 17- 18 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री उचकटून आतील एलजी कंपनीचा संगणक व 15,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या महेबुब शेख, रा. उपळे (मा.) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : नाईकनगर शिवारातील विशाल मालपाणी यांच्या शेतातील पत्रा शेडमधील दोन बैल दि. 31 जुलै ते 01 ऑगस्ट 2021 दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या ग्रामस्थ- राम चव्हाण यांनी दि. 18 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : नवीर काझी, रा. पुणे या दि. 18 ऑगस्ट रोजी 12.30 वा. सु. कळंब बसस्थानकातील फलाट क्र. 1 वरील बस मध्ये चढत असतांना अज्ञाताने गर्दीचा फायदा घेउन काझी यांच्या पर्समधील स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या काझी यांचा भाचा- इस्तियाक काझी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web