कळंब ,ताकविकी,कराळी ,तुगांव  येथे चोरीची घटना 

 
Osmanabad police

 कळंब : उमेश चव्हाण यांनी त्यांची होंडा शाईन मोटारसायकल क्रमांक एच एच 12 एस एम 0981 ही  दिनांक 06 जुलै रोजी  18.30 वा  छ.शिवाजी चौकात लावली असता अज्ञाताने चोरुन नेली.यावरुन चव्हाण यांनी दिले प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 बेंबळी : ताकविकी येथिल  आपले सरकार सेवा केंद्राचे चालक  जमीर शेख यांनी  दिनांक 10 जुलै रोजी  रात्री  03.00 वा घरातील खिडकीतुन दुकानाकडे पाहिले असता दुकानाचा पत्रा उचकटुन दोघे अज्ञात पुरुष चोरी करत असल्याचे दिसले. यावर जमीर यांनी आरडा-ओरड करताच ते दोघे  दुकानातील  प्रिंटर बाजुला टाकुन लॅपटॉप घेवुन पसार झाले. यावरुन जमीर शेख यांनी दिले प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

  उमरगा :  कराळी येथील  दत्ता जोगदंड यांच्या किराणा दुकानाचा कडी-कोयंडा अज्ञाताने दिनांक 09 जुलै रोजी पहाटे उचकटुन आतील 1604 रु किंमतीचा माल चोरुन नेला. यावरुन दत्ता जोगदंड  यांनी दिले प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 लोहारा :  आरणी येथील खंडेराव खरोसे यांच्या घराचा दरवाजा अज्ञाताने दिनांक 03 जुलै रोजी पहाटे तोडुन आतील 70 ग्रॅम सुवर्ण दागिने व 60 ग्रॅम चांदी, मनगटी घडयाळ चोरुन नेले. यावरुन खंडेराव खरोसे यांनी दिले प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.  

 
मुरुम : तुगांव  येथील विश्वनाथ बिराजदार यांनी ट्रॅक्टरची  ट्रॉली येणेगुर शिवारातील शेताजवळ सोडली होती. परिचयातील दोन पुरुषांनी बिराजदार यांना  न सांगता ती ट्रॉली वापरण्यास चोरुन नेली. यावरुन विश्वनाथ बिराजदार  यांनी दिले प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.  

From around the web