गुंजोटी,सावरगांव, मुरळी,तुळजापूर येथे चोरीची घटना 

 
Osmanabad police

उमरगा: इस्माइल कमालोद्दीन सिध्दीकी, रा. गुंजोटी, ता. उमरगा हे ट्रक क्र. एम.एच. 25 पी 9011 हा दि. 08.06.2021 च्या रात्री उमरगा येथील चौरस्ता परिसरातील पटेल मोटार गॅरेज समोर उभा करुन ट्रकच्या केबीनमध्ये झोपले होते. दरम्यान अंधाराची संधी साधुन अज्ञाताने त्यांच्या ट्रकच्या इंधन टाकीतील 272 लि. डिझेल चोरुन नेले. अशा मजकुराच्या इस्माइल सिध्दीकी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी: नागनाथ रामचंद्र जगताप, रा. सावरगांव, ता. तुळजापूर यांच्या सावरगाव गट क्र. 82 मधील शेतातील महादेव मंदीराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 05- 06.06.2021 दरम्यानच्या रात्री तोडून मंदीरातील एलईडी टीव्ही, 4 कि.ग्रॅ. वजनाच्या तांबे धातूची  भांडी व शेतीची रासायनिक औषधे चोरुन नेली. अशा मजकुराच्या नागनाथ जगताप यांनी दि. 08 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम: आण्णा खंडू महावरकर, रा. मुरळी, ता. उमरगा यांच्या ताब्यातील हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. आरजे 19 एसक्यु 2125 ही दि. 31.05.2021 ते 01.06.2021 रोजी दरम्यानच्या रात्री राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या आण्णा महावरकर यांनी दि. 08 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर: राजकुमार विजय रणदिवे, रा. नगर अपार्टमेंट, तुळजापूर यांनी त्यांची हिरो पॅशन प्रो मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एबी 5531 ही दि. 30.05.2021 रोजी 19.30 वा. सु. अपार्टमेंटच्या वाहन स्थळावर लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 07.00 वा. सु. ती त्यांना लावलेल्या जागी न आढळल्योन ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या राजकुमार रणदिवे यांनी दि. 08 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web