उस्मानाबाद जिल्ह्यात पाच ठिकाणी चोरीची घटना
उमरगा : पुणे येथील आरती बिराजदार या दिनांक 10 ऑगस्ट रोजी 13.50 वा उमरगा बसस्थानकातील बस मधे चढत असतांना अज्ञाताने गर्दीची संधी साधुन त्यांच्या गळयातील 19 ग्राम वजनाचे सुवर्ण गंठण चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी : माळुंब्रा येथील परमेश्वर नांगरे यांनी त्यांची शाईन मोटार सायकल क्रमांक एम एच 25 ए आर 6014 ही नातेवाईकांच्या ढाब्या समोर लावली असता दिनांक 10 ऑगस्ट रोजी 03.00 वा अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापुर: मथुराई नगर ,तुळजापूर येथील नागनाथ भादुले यांनी त्यांचे महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एम एच 12 एफ डी 1469 हे अंगणात ठेवले असता दिनांक 10 ऑगस्ट रोजी पहाटे अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : किणी येथील पांडुरंग कुंभार यांच्या दुकानाच्या शटरचे कुलुप अज्ञाताने दिनांक 09 – 10 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री तोडुन आतील लोखंडी सळया ,सीसीटीव्ही असा 2,53,000 रुपये रकमेचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : बाभळगाव येथील श्रीकांत वाघमारे हे दिनांक 10 ऑगस्ट रोजी 12.30 ते 16.00 दरम्यान कुटुंबासह शेतात गेले असता अज्ञाताने घराचे कुलुप उघडुन कपाटातील 100 ग्राम सुवर्ण दागिने व 1,85,000 रुपये चोरुन नेले.अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.