उमरग्यात दोन ठिकाणी चोरी 

 
Osmanabad police

उमरगा  : सुरेश शंकरराव पाटील, रा. आष्टा (ज.), ता. उमरगा यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 06 ऑगस्ट रोजी 09.00 ते 16.00 वा. दरम्यान तोडून घरातील कपाटीतले 72 ग्रॅम वजनाचे सुर्वण दागिने, चांदीचे दागिने- वस्तू व 2,10,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुरेश पाटील यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत विजयकुमार शिंदे यांची हिरो होंडा पॅशन प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 के 287 ही दि. 28.07.2021 रोजी 01.00 वा. सु. उमरगा येथील नरवडे हॉस्पीटल समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. यावरुन विजयकुमार शिंदे यांनी दि. 06 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : धाराशिव साखर कारखान्याच्या परिसरातील जीएसआर पाण्याच्या तळ्याच्या जागेतील वेल्डींग मशीन व 85 मीटर वायर असे एकुण 33,375 ₹ चा माल दि. 31.07.2021 रोजी 16.00 वा. सु. बबन किसन बावकर, रा. चोराखळी, ता. कळंब याने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या सुरक्षा अधिकारी- परमेश्वर कदम यांनी दि. 06 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 37

 
अपघात

बेंबळी  : सुनिल रामचंद्र चव्हाण, रा. जेवळी, ता. लोहारा व त्यांचे सासरे- बिभीषन हरीबा जाधव, वय 48 वर्षे, रा. शिवली, ता. औसा असे दोघे दि. 28.07.2021 रोजी 15.30 वा. सु. पाटोदा गावातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 24 बीके 1837 ने प्रवास करत होते. दरम्यान सुनिल चव्हाण यांनी मोटारसायकलचा निष्काळजीपने अचानक ब्रेक दाबल्याने मो.सा. धसरली. या अपघातात पाठीमागे बसलेले बिभीषन जाधव हे खालीपडून गंभीर जखी झाल्याने ते वैद्यकीय उपचारादरम्यान दि. 30 जुलै रोजी मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- सचिन बिभीषन जाधव यांनी 06 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web