वाशी, देवसिंगा , मसला येथे चोरीची घटना 

 
Osmanabad police

वाशी -  महादेव उंदरे, रा. वाशी यांनी दि. 19 जुलै रोजी 11.45 वा. आपल्या शेताजवळील दसमेगांव रस्त्यालगत आपली हिरो होंडा मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएन 1779 ही ठेवली होती. ती 12.10 वा. सु. ठेवल्या ठिकाणी न आढळल्याने ती अज्ञाताने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या महादेव उंदरे यांनी दि. 22 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 तुळजापूर -  हरीश्चंद्र आण्णासाहेब कुसाळकर, रा. देवसिंगा (तुळ), ता. तुळजापूर व सुनिल दादा मोरे, रा. जिजामाता नगर, तुळजापूर यां दोघांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 20- 21 जुलै दरम्यानच्या रात्री तोडून दोघांच्या घरातील एकत्रीपने सोने- चांदीचे दागिने, गॅस शेगडी व रोख रक्कम असा एकुण 1,73,500 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या हरीश्चंद्र कुसाळकर यांनी दि. 22 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी - मैनाबाई चंद्रशेखर दळवी व खंडु मारुती नरवडे, दोघे रा. मसला (खुर्द), ता. तुळजापूर या दोघांच्या घराचे कुलूप दि. 21- 22 जुलै दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून दळवी यांच्या घरातील- 33 ग्रॅम सुवर्ण दागिने, 70,000 ₹ रोख रक्कम आणि  नरवडे यांच्या घरातील- 15,000 रोख रक्कम तसेच गावातील छत्रपती शाहु महाराज माध्यमिक विद्यालयातील दोन ब्लॅकेट चोरुन नेले. अशा मजकुराच्या मैनाबाई दळवी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web