उमरगा, चिंचपूर, उस्मानाबाद येथे चोरीची घटना
उमरगा : विनोद रमेश पाटील, रा. उमरगा यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 9524 ही दि. 27 जुलै रोजी 19.30 वा. सु. उमरगा येथील स्पंदन फायनान्स कार्यालयासमोरुन अज्ञाताने चोरुन नेली. तर दुसऱ्या घटनेत महावीर चौधरी, रा. कदेर, ता. उमरगा यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 12 एचआर 9203 ही दि. 26 जुलै रोजी 11.00 ते 12.00 वा. दरम्यान औराद शिवारातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या विनोद पाटील व महावीर चौधरी या दोघांनी दि. 29 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
भुम : आण्णा नारायण सांगळे, रा. चिंचपुर (ढ.), ता. भुम यांनी त्यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एआर 7241 ही दि. 23 जुलै रोजी 23.00 वा. सु. आपल्या घरासमोर लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती मो.सा. लावल्या जागी न आढळल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या आण्णा सांगळे यांनी दि. 29 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर सौरउर्जा उच्चदाब वाहीनी उभारणी सुरू असलेल्या खांबावरील 360 मीटर ॲल्युमिनीयम तार दि. 28 जुलै रोजी 16.30 वा. पुर्वी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या कामगार- अक्षय अनिल मुळे, रा. उक्कडगाव, ता. बार्शी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
उमरगा - विश्वास पांडु पाटील, रा. माडज, ता. उमरगा यांनी चरण्यास मोकळे सोडलेल्या जनावरांनी शेजारचे शेतकरी- वैजिनाथ दत्तात्रय पाटील यांच्या शेतातील सोयाबीन पिक खाल्ले होते. याचा जाब वैजिनाथ यांनी विश्वास पाटील यांना दि. 21.06.2021 रोजी 12.30 वा. सु. विचारला असता विश्वास व शरद या पिता- पुत्रांनी वैजिनाथ यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठी, कंबर पट्ट्याने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या वैजिनाथ पाटील यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 427, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.