खडकी,चांदवड,वरवंटी,गंजेवाडी येथे चोरीची घटना
तामलवाडी : सागर तुकाराम मनसावले, रा. खडकी, ता. तुळजापूर यांच्या शेतातील शेडमधील 2 बकरे दि. 29- 30 जुलै दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या सागर मनसावले यांनी दि. 05 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : चांदवड येथील सिध्दीविनायक भारत गॅस एजन्सीच्या गुदामाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 31.07.2021 ते 04.08.2021 रोजी दरम्यान तोडून आतील 40 एलपीजी सिलींडर चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या एजन्सी मालक- अमर श्रीकांत दिक्षीत यांनी दि. 05 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : भुजंग मारुती उबाळे, रा. वरवंटी, ता. उस्मानाबाद यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएफ 3310 ही दि. 04 ऑगस्ट रोजी 10.30 ते 16.00 वा. दरम्यान समर्थनगर परिसरातून अज्ञाताने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या भुजंग उबाळे यांनी दि. 05 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी : गंजेवाडी येथील अंगणवाडी क्र. 814 च्या खोलीचा कडी- कोयंडा दि. 04- 05 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून आतील एलईडी टीव्ही संच व एक रिमोट चोरुन नेला. तसेच ग्रामस्थ- दादाराव लोकरे यांच्या पत्रा शेडचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या अंगणवाडी सेविका- श्रीमती मनिषा जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380, 454, 511 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.