डिकसळ,अणदूर, बेंबळी येथे चोरीची घटना 

उस्मानाबादेत एकाचा विश्वासघात 
 
Osmanabad police

कळंब : भागवत गोरोबा आदमाने, रा. डिकसळ, ता. कळंब यांच्या शेतातील दोन गाई दि. 09 ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या भागवत आदमाने यांनी दि. 16 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : फैसल महमदहानिफ शेख, रा. अणदुर, ता. तुळजापूर यांनी दि. 13 ऑगस्ट रोजी 12.00 ते 14.00 वा. दरम्यान अणदुर शेत शिवारात आपल्या शेळ्या चरण्यास सोडल्या होत्या. दरम्यानच्या काळात त्यातील तीन शेळ्या अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फैसल शेख यांनी दि. 16 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी : विजय खापरे, रा. बेंबळी हे दि. 16 ऑगस्ट रोजी बेंबळी येथील आठवडी बाजारात असतांना आंध्रप्रदेशातील लक्ष्मी मादगी या महिलेने गर्दीचा फायदा घेउन खापरे यांच्या सदऱ्याच्या खिशातील रेडमी स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या विजय खापरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
विश्वासघात

उस्मानाबाद: ईलेक्ट्रोपॅथ सर्विसेस इंडीया प्रा. लि., पुणे या कंपनीने राघुचीवाडी -जाधववाडी शिवारात शेती वीज वितरण वाहिनी उभारण्याचा ठेका जगमोहनलाल सैनी, रा. जयपुर, राज्य- राजस्थान यांना दिला होता. या कामाकरीता सैनि यांनी नमूद कंपनीच्या गुदामातून 3,51,107 ₹ किंमतीचे इन्सुलेटर, तार, नट- बोल्ट, विद्युत मीटर असे वीज वाहिनी साहित्य ताब्यात घेतले होते. परंतु नमुद काम पुर्ण न करता तसेच साहित्य परत न करता ठेकेदार- सैनी हे दि. 07 ऑगस्ट रोजी कराराचे उल्लंघन करुन काम सोडून निघून गेले. अशा तऱ्हेने सैनी यांनी नमूद कंपनीचा विश्वासघात केला. यावरुन प्रकल्प व्यवस्थापक- उत्तम महाजन यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सैनी यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 406 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web