मनाई आदेश झुगारुन दुकान, हॉटेल, हातगाडे चालू ठेवले

उस्मानाबाद जिल्ह्यात आठ  गुन्हे दाखल
 
Osmanabad police

उस्मानाबाद  -  कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या आदेशाने जिल्ह्यात विविध मनाई आदेश लागू असून त्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलीस दलातर्फे काल दि. 05.06.2021 रोजी खालील प्रमाणे विविध कायदा- कलमांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 8 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

1) हिरालाल पेडगावकर, रा. परंडा यांनी 11.00 वा. सु. परंडा येथील आपले ‘समर्थ ज्वेलर्स’ दुकान व्यवसायास चालू ठेउन नाका- तोंडास मास्क न लावता निष्काळजीपणाचे कृत्य केले असतांना तर प्रशांत डुकरे, रा. माणकेश्वर, ता. भुम यांनी 13.00 वा. सु. गावातील ‘श्री हॉटेल’ हे व्यवसायास चालू ठेवले असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.

2) मिलींद भोसले व आनंद आदमाने, दोघे रा. तुळजापूर या दोघांनी यांनी 19..05 ते 20.00 वा. सु. तुळजापूर येथील अनुक्रमे किराणा दुकान व चिकन दुकान व्यवसायास चालू ठेवले असतांना तर रमेश धनके, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर यांनी 20.30 वा. सु. गाव शिवारातील आपला ‘मातोश्री ढाबा’ व्यवसायास चालू ठेवला असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.

3) सतिष चौधरी, रा. कदेर, ता. उमरगा यांनी 18.40 वा. सु. गावातील आपले किराणा दुकान व्यवसायास चालू ठेवले असतांना तर नरसिंग कावळे, रा. उमरगा यांनी 19.30 वा. सु. गुंजोटी येथे गल्लोगल्ली फिरुन पिकअप क्र. एम.एच. 25 एजे 2704 मधून भाजीपाला विक्री करत असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

4) ब्रम्हानंद बिराजदार, रा. सारणी, ता. औसा यांनी 18.00 वा. सु. ताडगाव तपासणी नाका येथे सार्वजनिक ठिकाणी नाका- तोंडास मास्क न लावता स्वत:च्या व इतरांच्या जिवीतास धोका होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य केले असतांना शिराढोन पो.ठा. च्या पथकास आढळले.

From around the web