तुळजापूरात सोळा शिक्षकांचा तालुका पुरस्काराने विशेष गौरव

 
d

तुळजापूर येथे तालुका शिक्षक पुरस्कार हा कार्यक्रम संपन्न झाला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. राणा जगजीतसिंह पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष बोबडे ,महेंद्र धुरगुडे ,तहसीलदार सौदागर तांदळे , गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड , गटशिक्षणाधिकारी मेहरुन्निसा इनामदार आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 16 शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .

 यावेळी आ. पाटील यांनी  जुनी पेन्शन संदर्भात शासन सकारात्मक असून सर्व प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होईल असे सांगून  आपल्या सेवाकाळात शिक्षकांनी सक्षम व समर्थ नागरिक घडवण्याचे काम शिक्षकांनी करावे .कारण शिक्षकाच्या माध्यमातूनच चांगली पिढी घडत असते.सामाजिक गरजा शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून पूर्ण होतात .त्यामुळे अधिक जबाबदारी काम करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . भावी काळात तुळजापूर तालुक्यातून महामार्गाचे जाळे तयार होत असल्याने उद्योगधंद्यासाठी रोजगाराच्या सर्व प्रकारच्या संधी मिळणार आहेत . स्थानिकातूनच सर्वांना रोजगार मिळेल याची जाणीव ठेवून सक्षम विद्यार्थी तयार करावेत व सामाजिक योगदान देऊन आपले वेगळेपण दाखवून देण्याचे आवाहन त्यांनी केले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी श्रीम. मेहरुन्नीसा इनामदार यांनी केले . यात त्यांनी तालुक्यातील शैक्षणिक आढावा मांडून तालुक्यात शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावलेला असून गुणवत्तेबरोबरच क्रीडा , संगीत व इतर सहशालेय उपक्रमाची जोड देऊन तालुक्याने आपले वेगळेपण दाखवल्याचे सांगितले. मसला खुर्द जिप शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य गीत व  ईशस्तवन तर संगीत साधक शिक्षक समूह अणदूर यांनी स्वागत गीत  सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली .
 पुरस्कार प्राप्त शिक्षिका ज्ञानेश्वरी शिंदे नरवडे यांनी पुररस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना कौतुकाची थाप अधिक उत्साह वाढवते असे सांगितले . विस्ताराधिकारी डॉ यशवंत चव्हाण यांनी आभार मानले तर श्री विठ्ठल नरवडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विस्तार अधिकारी अर्जुन जाधव , डॉ .यशवंत चव्हाण , मल्हारी माने, मल्लिनाथ काळे ,शोभा राऊत , तात्या माळी , दैवशाला शिंदे ,केंद्रप्रमुख संजय सोलनकर ,तानाजी महाजन , ऋषिकांत भोसले , सतीश हुंडेकरी ,तुकाराम क्षिरसागर ,संजय वाले ,विठ्ठल गायकवाड ,सत्तेश्वर जाधव , विश्वनाथ सोनटक्के ,बळवंत सुरवसे ,अनिल करदुरी , अरुण अंगोले ,सोलसे एस व्ही ,अनिल राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले 


पुरस्कार प्राप्त शिक्षक
तांबे संकल्पना लहू , चादरे वंदना किसन , चव्हाण गुलाब गोपा , शिंदे ज्ञानेश्वरी आनंदराव ,कोळी सहदेव भानुदास , ढोबळे विश्वास गोरोबा ,सुर्वे उमेश बाळासाहेब , जाधव समीर दत्तात्रय ,मोकाशे सुनंदा माणिकराव ,काळे गुणवंत दिगंबर ,मस्के राजकुमार गोपीनाथ ,कुलकर्णी मनीषा पद्माकर ,जाधव राहुल शेषराव , सोनवणे पांडुरंग शहाजी , पवार वैशाली भास्करराव ,उंडे संदीप सोपानराव 

From around the web