मनाई आदेश झुगारुन दुकान, हॉटेल, हातगाडे चालू ठेवले, सहा गुन्हे दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद - कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या आदेशाने जिल्ह्यात विविध मनाई आदेश लागू असून त्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलीस दलातर्फे दि. 04.06.2021 रोजी खालील प्रमाणे विविध कायदा- कलमांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

1) लक्ष्मण राम लोंढे व गणेश आबाराव गवळी, दोघे रा. तामलवाडी, ता. तुळजापूर यांनी 12.00 वा. सु. तामलवाडी येथील पिंपळा रस्त्यालगतचे अनुक्रमे हॉटेल व मोबाईल शॉपी हे व्यवसायास चालू ठेवले तर जावेद पटेल, रा. येडशी यांनी 12.00 वा. सु. गावातील आपले फुटवेअर दुकान व्यवसायास चालू ठेवले असतांना तामलवाडी पो.ठा. च्या पथकास आढळले.

2) कालिदास पांडुरंग देशमुख, रा. तलमोड, ता. उमरगा यांनी 18.30 वा. सु. तलमोड येथील आपले ‘ओमसाई किराणा दुकान’ व्यवसायास चालू ठेवले तर जमिन मकबुलसाब बागवान, रा. तुरोरी, ता. उमरगा यांनी 18.00 वा. सु. गावातील मुख्य रस्त्यावर फळगाडा व्यवसायास चालू ठेवला असतांना  उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

3) रफीक पापालाल शेख, रा. सोनारी, ता. परंडा यांनी 13.00 वा. सु. सोनारी येथील आपले हॉटेल व्यवसायास चालू ठेवले असतांना आंबी पो.ठा. च्या पथकास आढळले.

4) इंदर राम अमरनाथ, रा. पारगाव शिवार, ता. वाशी यांनी 17.00 वा. सु. पारगाव येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेले आपले हॉटेल व्यवसायास चालू ठेवले असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.

From around the web