मनाई आदेश झुगारुन दुकान, हॉटेल, हातगाडे चालू ठेवले, 11 गुन्हे दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद - कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या आदेशाने जिल्ह्यात विविध मनाई आदेश लागू असून त्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलीस दलातर्फे दि. 25 मे रोजी खालील प्रमाणे विविध कायदा- कलमांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

1) रंजीत गायकवाड, रा. अंबेहोळ, ता. उस्मानाबाद यांनी 12.20 वा. सु. गावातील आपले किराणा दुकान व्यवसायास चालू ठेवले तर जावेद पटेल, रा. येडशी यांनी 12.00 वा. सु. गावातील आपले फुटवेअर दुकान व्यवसायास चालू ठेउन ग्राहकांची गर्दी जमवली असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पोलीसांना आढळले.

2) अनिल शिंदे, रा. आरसोली, ता. भुम यांनी 12.12 वा. सु. भुम येथील आपले फुटवेअर दुकान व्यवसायास चालू ठेवले असतांना  भुम पोलीसांना आढळले.

3) युवराज राउत, रा. वाशी यांनी 12.30 वा. सु. वाशी येथे आपला हातगाडा व्यवसायास चालू ठेवला असतांना वाशी पोलीसांना आढळेल.

4) अलताफ पठाण, रा. येरमाळा यांनी 17.05 वा. सु. येरमाळा- बार्शी रस्त्यालगतचे आपले चिकन सेंटर व्यवसायास चालू ठेउन नाका- तोंडास मास्क न लावता कोविड- 19 संदर्भाने निष्काळजीपणाचे कृत्य केले असतांना येरमाळा पोलीसांना आढळले.

5) इलाही शेख, रा. चिंचपुर (खुर्द), ता. परंडा यांनी 18.00 वा. सु. गावतील आपले चिकन सेंटर व्यवसायास चालू ठेउन कोविड- 19 संदभाने निष्काळजीपणाचे कृत्य केले असतांना आंबी पोलीसांना आढळले.

6) रोहित सुतार, रा. लासोना, ता. उस्मानाबाद यांनी 19.05 वा. सु. उस्मानाबाद येथील आपले वेल्डींग दुकान चालू ठेउन व्यवसाय करतांना व कोविड- 19 संसर्गाची निष्काळजीपणाची कृती केली असतांना उस्मानाबाद (श.) पोलीसांना आढळले.

7) वाहिद शेख, रा. तामलवाडी यांनी 12.30 वा. सु. तामलवाडी येथील आपले गॅरेज चालू ठेउन कोविड- 19 संसर्गाची निष्काळजीपणाची कृती केली असतांना  भुम पोलीसांना आढळले.

8) विकास घुगे, रा. हागलुर, ता. तुळजापूर यांनी 16.00 वा. सु. गावतील आपले किराणा दुकान व्यवसायास चालू ठेवले तर समाधान जाधव, रा. शिरगापुर यांनी गावतील आपले किराणा दुकान चालू ठेउन ग्राहकांची गर्दी जमवली तर अकलाख मौजन, रा. नळदुर्ग यांनी 17.00 वा. सु. नळदुर्ग येथील आपले हॉटेल व्यवसायास चालू ठेवले असतांना नळदुर्ग पोलीसांना आढळले.

From around the web