उस्मानाबाद जिल्ह्यात लैंगिक छळ, अपघात, मारहाण गुन्हे दाखल
उस्मानाबाद - जिल्ह्यातील एका गावातील एक 29 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 21.02.2021 रोजी 12.00 वा. सु. आपल्या राहत्या घरात असतांना गावातीलच एका पुरुषाने तीच्यावर लैंगीक अत्याचार करुन घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीच्या पतीस ठार मारण्यात येईल अशी तीला धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अपघात
उस्मानाबाद - आळणी, ता. उस्मानाबाद येथील राजेंद्र बळीराम माळी यांनी दि. 19.06.2021 रोजी गावातील रस्तयावर ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एच 8533 हा निष्काळजीपने चालवल्याने ट्रॅक्टरला पाठीमागे जोडलेल्या पेरणी यंत्राचा धक्का समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला लागल्याने चालक गावकरी- सुमित विनायक वीर हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या सुमित वीर यांनी दि. 15 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
भूम : इंदिरानगर, भुम येथील सतिष काळे, सुनिल, काळे, कौशला, काळे, सोनी, काळे अशा चौघांनी दि. 13 जुलै रोजी 19.00 वा. सु. राहत्या वसाहतीत भाऊबंद- अनिल मछिंद्र काळे यांना पुर्वीच्या वादावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, दगडाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अनिल काळे यांनी दि. 15 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.